‘बिग बॉस ओटीटी 2’चा विजेता जाहीर; ‘या’ स्पर्धकाने मोडले वोटिंगचे सर्व रेकॉर्ड
(entertenment news) बिग बॉस ओटीटीचा दुसरा सिझन सुरू होऊन फक्त चार आठवडे झाले आहेत. या सिझनची लोकप्रियता पाहता निर्मात्यांनी हा शो आणखी दोन आठवड्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यातील स्पर्धक आणि त्यांच्या कारनाम्यांमुळे हा शो सोशल मीडियावर दररोज चर्चेत असतो. बेबिका धुर्वे, जद हदिद, अविनाश सचदेव, फलक नाज, पूजा भट्ट यांसारख्या स्पर्धकांमुळे या शोचा टीआरपी वाढतोय. यादरम्यान एल्विश यादव आणि आशिका भाटिया यांच्या वाइल्ड कार्ड एण्ट्रीमुळे शो आणखीनच रंजक बनला आहे. नुकतेच या शोमधून दोन स्पर्धक बाद झाले. तर दुसरीकडे सोशल मीडियावर ‘बिग बॉस ओटीटी 2’च्या एका स्पर्धकाला भरभरून प्रेम मिळतंय. जवळपास एक दशलक्षांहून अधिक युजर्सनी या स्पर्धकाला आधीच विजेता म्हणून घोषित केलं आहे.
बिग बॉसच्या घरातील हा लोकप्रिय स्पर्धक दुसरा-तिसरा कोणी नसून सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि युट्यूबर एल्विश यादव आहे. जेव्हापासून त्याने ‘बिग बॉस ओटीटी 2’मध्ये पाऊल ठेवलंय, तेव्हापासून संपूर्ण खेळच बदलला आहे. केवळ प्रेक्षकांचाच नाही तर तो बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांचाही लाडका झाला आहे. एल्विशमुळे बिग बॉस ओटीटीचा हा सिझन आणखी मजेशीर झाल्याचं मत अनेकांनी मांडलं आहे.
बिग बॉसच्या घरात एल्विश हा अभिषेक मल्हान आणि मनीषा राणी यांच्यासोबत बरीच मजामस्ती करताना दिसतो. तर दुसरीकडे तो अविनाश सचदेवला टारगेट करतोय. एल्विशची ही खेळी चाहत्यांना फारच आवडली आहे. आपल्या याच खेळीने तो सोशल मीडियावर लोकप्रिय ठरतोय. त्याने मनीषा राणी आणि अभिषेक मल्हान यांसारख्या सेलिब्रिटींनाही मागे टाकलं आहे. बिग बॉसच्या घरातील एल्विशचं वागणं प्रेक्षकांना फारच आवडतंय. म्हणून ट्विटरवर चाहत्यांनी आता त्याला थेट विजेता म्हणूनच घोषित केलं आहे.
एल्विश हा बिग बॉस ओटीटीच्या घरातील सिंह आहे, असं काहीजण म्हणतायत. तर काहींनी त्याला सर्वोत्कृष्ट एंटरटेनरचा किताब दिला आहे. एल्विशला स्क्रीनवर अधिक का दाखवलं जात नाही, अशीही तक्रार काहीजण बिग बॉसच्या निर्मात्यांकडे करत आहेत. वीकेंड का वार एपिसोडमध्ये सलमान खाननेही एल्विशचं कौतुक केलं आहे. सलमानने आधी त्याला त्याच्या नावाचा अर्थ विचारला आणि त्यानंतर त्याने जिया शंकरची चांगलीच शाळा घेतली. कारण जियाने एल्विशला साबण मिसळलेलं पाणी प्यायला दिलं होतं.(entertenment news)
जियाच्या याच वागणुकीबद्दल सलमानने तिला फटकारलं. इतकंच नव्हे तर तिला धडा मिळावा यासाठी सलमानने जियाला मिरचीचं पाणी प्यायला सांगितलं होतं. जिया ते पाणी पिणार इतक्यात सलमानने तिला रोखलं होतं. पण तिच्या या वागणुकीबद्दल त्याने जियाला एल्विशची मनापासून माफी मागण्यास सांगितलं. यासोबतच सलमानने घरातील इतर स्पर्धकांनाही सवाल केला की त्यांनी एल्विशला साबणाचं पाणी पिण्यापासून का रोखलं नाही?