कोल्हापुर जिल्ह्यातल्या 22 मार्गावरील वाहतूक पूर्ण बंद

राज्यात मुसळधार पावसानं (rain) हजेरी लावली आहे. राज्यातील अनेक भागांत पवासामुळे मोठं नुकसान झालं आहे. याचा फटका कोल्हापूरला देखील बसला आहे. जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. जिल्ह्यातील 22 मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद झाले आहेत. नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली असून, नदी काठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे कोल्हापूरकडे जाणारे सहा राज्य मार्ग आणि 16 जिल्हा मार्ग बंद झाले आहेत. याचा मोठा परिणाम हा वाहातुकीवर झाला आहे.
विदर्भात पावसाचा हाहाकार
विदर्भात देखील कोसळधार पाऊस (rain) सुरू आहे. यवतमाळ, बुलढाणा, अमरावती या जिल्ह्यांना पावसानं झोडपून काढलं आहे. अनेक गावांना पुराच्या पाण्याचा वेढा पडल्यानं संपर्क तुटला आहे. हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. उभं पीक पण्यामुळे नष्ट झाल्यानं बळीराजा हवालदील झाला आहे.
हवामान विभागाचा अंदाज
दरम्यान आज राज्यातील 8 जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुणे, ठाणे, पालघर, सातारा, रत्नागिरी, रायगड, सिंधुदूर्ग, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तर मुंबईमध्ये यलो अलर्ट देण्यात आला असून जोरदार पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. विदर्भात देखील यलो अलर्ट देण्यात आला आहे.