पंचगंगा नदीने ओलांडली इशारा पातळी; कोल्हापूर जिल्हा प्रशासन खडबडून जागे
जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ (increase) सुरूच असून रविवारी मध्यरात्री पंचगंगेने ३९ फूट ही इशारा पातळी गाठली होती. दरम्यान आज (सोमवार) सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास राजाराम बंधारा येथे पंचगंगा नदीने ३९ फूट ०३ इंच अशी इशारा पातळी ओलांडली आहे.
यामुळे आता शहरासह जिल्ह्यात पूरस्थितीत वाढ होण्याची शक्यता आहे. पाणी पातळीत सतत वाढ (increase) सुरू असल्याने संभाव्य महापुराच्या धोक्याने पूरप्रवण भागातील नागरिक, जनावरांचे स्थलांतर सुरू झाले आहे. व्यापार्यांनीही साहित्य सुरक्षितस्थळी हलवण्यास सुरुवात केली आहे.
जिल्ह्यातील अनेक रस्त्यांवर पूराचं पाणी आलं असून अनेक ठिकाणची वहातुक खोळंबळी आहे. जिल्ह्यातील 82 बंधारे पाण्याखाली गेले असून जिल्ह्यातील धरणे देखील झपाट्याने भरत आहेत. कोल्हापूर जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले असून नदी काठच्या गावांना स्थलांतर होण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.