श्रावण स्पेशल : उपवासाची पानगी

उपवासाची पानगी

साहित्य :

दोन वाटय़ा वरईच्या तांदळाचे पीठ, पाऊण वाटी पिठीसाखर, एक चमचा तुपाचे मोहन, चवीला मीठ(salt), दूध.

कृती :

सर्व साहित्य एकत्र करुन त्यात दूध घालून भाकरीच्या पिठापेक्षा सैलसर भिजवावे. नंतर केळीच्या पानाच्या लहान तुकडय़ाला तुपाचा हात फिरवून त्यावर पानगी थापावी. वरुन पानाचेच झाकण घालून तव्यावर टाकावी. वर ताटली झाकावी. वाफ आली की झाकण काढून पानगी उलटावी. गरम गरम पिठीसाखर किंवा उपवासाच्या हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *