अस्सल मराठवाडी स्टाईलने दही धपाटे

पावसाळ्याच्या दिवसात काहीतरी गरमागरम खाण्याची इच्छा प्रत्येकालाच होत असते. बाहेर पावसाची रिपरिप सुरू असताना वाफाळलेला चहा किंवा कांदा भजी तुम्ही ट्राय केली असतीलच.
पावसाळ्याच्या दिवसात पोट आणि जिभेला तृप्त करणाऱ्या खमंग पदार्थाची रीसिपी (recipe) आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जालना जिल्ह्यासह मराठवाड्यात घराघरात तयार होणारे दही धपाटे हा या पावसाळ्याच्या दिवसांत उत्तम पर्याय ठरू शकतो.
साहित्य:
दही धपाटे तयार करण्यासाठी ज्वारीच्या हुरदड्याचे पीठ, थोडेसे गहू आणि ज्वारीचे पीठ, चिरलेल्या कांदा, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर, पालक या साहित्याची आवश्यकता असते.
रीसिपी:
सर्वप्रथम हुरडा पीठात ज्वारी आणि गव्हाचे पीठ मिक्स करून घ्यावे. बारीक चिरलेली हिरवी मिरची, कांदा, लसूण, पालक आणि कोथिंबीर त्यात टाकावी. हे सर्व मिश्रण एकजीव करावे. यामध्ये आणखी काही मसाले टाकावे. त्याचबरोबर ओवा, मीठ आणि हळद टाकवी. यानंतर या सर्व मिश्रणाची कणीक तयार करावी.
ही कणीक जास्त घट्ट किंवा पातळ होणार नाही याची काळजी घ्यावी. यानंतर एक स्वच्छ रुमाल तटावर अंथरूण त्यावर कनकेपासून भाकरीच्या आकाराचे धपाटे तयार केले जातात. हे धपाटे तव्यावर टाकून दोन्ही बाजूंनी व्यवस्थित भाजून घावे. तव्यावर टाकल्यानंतर थोडेसे तेल बाजून टाकावे. व्यवस्थित दोन्ही बाजूंनी भाजून घेतल्यानंतर गरमागरम धपाटे तयार होतात. ही धपाटे आपण दही आणि शेगदाण्याची चटणी यासोबत सर्व्ह करू शकतो.
अतिशय कमी साहित्यात तयार होणारे हे धपाटे अतिशय पौष्टीक असतात. कमी वेळात सकाळच्या नास्त्या साठी हे दही धपाटे एक उत्तम चॉईस असू शकतात. आपण देखील घराच्या घरी ही दहा धपट्यायाची सोपी आणि तितकीच टेस्टी रेसिपी (recipe) ट्राय करू शकता.