सनी देओल आणि ‘गदर 2’ चे चाहते सोशल मीडियावर सुसाट
(entertenment news) बहुचर्चित, बहुप्रतिक्षित ‘गदर 2’ सिनेमाचा ट्रेलर अखेर लाँच झाला आहे. मागच्या बऱ्याच महिन्यांपासून चित्रपटप्रेमींमध्ये ‘गदर 2’ सिनेमाची चर्चा आहे. पुन्हा एकदा तारा सिंह पाकिस्तानात जाऊन धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज आहे. तारा सिंह यावेळी सकीनासाठी नाही, तर आपल्या मुलासाठी पाकिस्तानात जाणार आहे. ‘गदर 2’ चा ट्रेलर लाँच झाला असून रिलीजनंतर ट्रेंडिंगमध्ये आहे. ‘गदर 2’ चा ट्रेलर पाहून फॅन्स पुन्हा एकदा जुन्या काळात गेले आहेत.
पुन्हा एकदा सनी देओलचा जुना जलवा पहायला मिळाला आहे. ट्रेलरमध्ये हँडपंपचा सीन पाहून चाहत्यांमध्ये एक वेगळा उत्साह संचारला आहे. मोठ्या पड्द्यावर पुन्हा एकदा तारा सिंहला हँडपंप मूळापासून उखडताना पहायच आहे.
त्या सीनवर शिट्टया वाजल्या. टाळ्यांचा कडकडाट
‘गदर 2’ चा ट्रेलर लाँच झाल्यानंतर सोशल मीडियावर हँडपंपबद्दल अनेक मजेदार मीम्स व्हायरल झाले आहेत. ट्रेलरच्या शेवटी, सनी देओल हँडपंपकडे रागाने पाहताना दिसतो. ट्रेलरमध्ये सनी देओलला हँडपंप मूळापासून उखडताना दाखवलेलं नाही. पण या सीनवर मोठ्या प्रमाणात शिट्टया वाजल्या. टाळ्यांचा कडकडाट झाला. एका पेजने हँडपंपवरुन मीम बनवला आहे.
फॅन्स खूप उत्साहित
अबीबी नावाच्या यूजरने फोटो शेयर केलाय. त्यात वाहत्या नदीजवळ एक हँडपंप दिसतो. हा हँडपंप तारासिंहची वाट पाहतोय, असं युजरने लिहिलं आहे. हँडपंप चित्रपटात पाहून फॅन्स खूप उत्साहित आहेत. काही युजर्स चित्रपटाचा ट्रेलर पाहून थोडे नाखुशही आहे. हा चित्रपट अजून चांगला होऊ शकला असता, असं त्यांच म्हणणं आहे. (entertenment news)
पहिला गदर कधी प्रदर्शित झालेला?
22 वर्षांपूर्वी 2001 साली गदर चित्रपट प्रदर्शित झाला होता. अनिल शर्मा यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. सनी देओल, अमिषा पटेल, अमरीश पुरी, लिलेट दुबे यांनी या चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्या होत्या. फाळणीवर आधारित हा चित्रपट होता. यात अमिषा पटेलने सकीना आणि सनी देओलने तारा सिंहच कॅरेक्टर रंगवलं होतं. अमरिश पुरी आणि सनी देओल यांच्या डायलॉगमुळे हा चित्रपट सिनेरसिकांच्या विशेष लक्षात राहिला.