दिशा पेक्षाही सुंदर दिसते बहीण, ‘या’ क्षेत्रात करते काम; ऐकून तुम्हीही माराल सॅल्यूट
(entertenment news) दिशा पटनी ही बॉलिवूडमधील सर्वात सुंदर आणि ग्लॅमरस हिरोईनपैकी एक आहे. दिशा पटनीने अवघ्या 6 वर्षांच्या करिअरमध्ये 6 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रभाव टाकू शकले नसले तरी तिची फॅन फॉलोईंग जबरदस्त आहे. तिच्या बोल्ड ग्लॅमरस अंदाजासोबतच दिशा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत राहिली आहे. आज आम्ही तुम्हाला दिशा पटनी विषयी कधीच न ऐकलेली गोष्ट सांगणार आहोत.
दिशा पटनी एका सुशिक्षित कुटुंबात वाढली असून आई, वडिलांसोबतच तिला एक मोठी बहीण देखील आहे. दिशा पटनीची मोठी बहीण खुशबू पटनीही खूप सुंदर दिसते. खुशबू सौंदर्य आणि ग्लॅमरच्या बाबतीत तिची बहीण दिशासोबत स्पर्धा करते. मात्र खुशबू ग्लॅमरच्या जगापासून दूर राहते. खुशबू पटनी दिशापेक्षा वयाने मोठी आहे. तिची खास गोष्ट म्हणजे ती भारतीय सैन्यात अधिकारी आहे. देशाच्या रक्षणासाठी खुशबू सैन्यात काम करते. दिशा बॉलिवूडमध्ये नाव कमावत आहे तर तिची बहीण भारतीय सैन्यात देशाच्या रक्षणार्थ तैनात आहे.
खुशबू पाटणीने अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे. यानंतर खुशबू भारतीय लष्करात लेफ्टनंट म्हणून कार्यरत आहे. खुशबू पटनी अनेकदा तिची धाकटी बहीण दिशासोबत फोटो शेअर करताना दिसते. खुशबू आणि दिशा दोघीही सुंदर दिसतात. खुशबी आणि दिशाला एक लहान भाऊही आहे. दिशा इंस्टाग्रामवर अनेकदा त्यांच्यासोबतचे फोटो शेअर करते.
दिशा आणि खुशबू या बहिणींसोबतच चांगल्या मैत्रिणी आहेत. खुशबूचे फोटोही सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. दिशा अनेकदा सणासुदीच्या निमित्ताने तिच्या भावासोबत दिसते. (entertenment news)
दिशा पाटनीच्या सौंदर्यावर लाखो लोक फिदा आहेत. दिशाने 2015 साली ‘लोफर’ या चित्रपटातून तिच्या करिअरची सुरुवात केली होती. यानंतर 2016 मध्ये आलेल्या एमएस धोनी या चित्रपटात दिशाने सर्वोत्कृष्ट भूमिका साकारली होती. या व्यक्तिरेखेनंतर दिशा पटनी सुपरहिट झाली. यानंतर दिशा सतत चित्रपटांमध्ये काम करत आहे. यासोबतच ग्लॅमर क्वीन दिशाने आतापर्यंत 6 चित्रपटांमध्ये काम केले आहे. तर तिच्या पुढ्यात 5 आगामी चित्रपट आहेत. जे लवकरच प्रदर्शित होतील. दिशाने अवघ्या काही वर्षांत प्रसिद्धी मिळवली आहे.