समाजवादी प्रबोधिनीच्या वतीने उद्यानपंडित गणपतराव पाटील यांचा सत्कार
शिरोळ/ प्रतिनिधी:
श्री दत्त सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, उद्यानपंडित गणपतराव पाटील यांचा समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी यांच्या हस्ते शाल व ग्रंथ भेट देऊन सत्कार (felicitation) करण्यात आला.
उद्यानपंडित गणपतराव पाटील यांना दि शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन ऑफ इंडियाचा ‘लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड’ आणि गडहिंग्लजच्या विद्या प्रसारक मंडळाचा डॉ. घाळी समाजभूषण पुरस्कार हे दोन प्रतिष्ठित पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल प्रबोधिनीच्या वतीने हा सत्कार (felicitation) करण्यात आला.
यावेळी कारखान्याचे संचालक इंद्रजीत पाटील, विनयाताई घोरपडे, दत्त बझाचेचेअरमन दामोदर सुतार गुरुजी, नवभारत शिक्षण संस्थेचे सचिव गौतम पाटील, महादेव राजमाने यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी समाजवादी प्रबोधिनीच्या प्रबोधन प्रकाशन ज्योती मासिकाच्या ऑगस्ट महिन्यातील अंकाचे प्रकाशनही सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.