टाकळीवाडी येथील श्री हायस्कूल शाळा व कुमार विद्यामंदिर येथे स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात संपन्न
पत्रकार नामदेव निर्मळे
टाकळीवाडी तालुका शिरोळ येथील श्री सरस्वती हायस्कूल शाळा व कुमार विद्या मंदिर येथे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन (independence day) मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला. श्री सरस्वती हायस्कूल शाळेमध्ये ध्वजारोहण शालेय समिती अध्यक्ष जितेंद्र कोथळी यांच्या हस्ते करण्यात आला. कुमार विद्या मंदिर येथे ध्वजारोहण गावचे सरपंच मंगल बिरणगे यांच्या हस्ते करण्यात आला.
मराठी शाळा येथे स्टेज बांधकाम पूर्ण केल्याबद्दल निशांत गोरे ,गणेश गोरे ,प्रज्वल कोळी व कार्यकर्ते यांचा सत्कार करण्यात आला. मराठी शाळेला साऊंड सिस्टिम कै.बाळासो बाबगोडा पाटील यांचे स्मरणार्थ डॉ.विजय बाळासो पाटील यांचे कडून देण्यात आले. मराठी शाळेसाठी प्रिंटर श्री संजय पाटील माजी कॅशियर फेडरल बँक यांच्याकडून देण्यात आला.
मराठी शाळे येथे मैदान बांधकाम देणगीदार श्री गणपती खोत माजी पोलीस उपनिरीक्षक यांचा सत्कार करण्यात आला.
हायस्कूल शाळेचे मुख्याध्यापक संजय तपासे सर यांचा विशेष सत्कार उत्कृष्ट कामगिरीबद्दल राजश्री शाहू क्रीडा मंडळ व सैनिक असोसिएशन यांच्याकडून करण्यात आला.
मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम (independence day) संपन्न झाला .यावेळी गावातील सर्व नागरिक ,तरुण मंडळे, सैनिक वेल्फेअर असोसिएशन, सर्व शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, शिक्षिका, सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी, मोठ्या संख्येने उपस्थित होते.