टाकळीवाडी येथे 350 वृक्ष जगवण्यासाठी सैनिक असोसिएशनची धडपड
पत्रकार नामदेव निर्मळे
—————————————
टाकळीवाडी तालुका शिरोळ येथील सैनिक असोसिएशनने कारगिल विजय दिनानिमित्त टाकळीवाडी गावामध्ये 350 वृक्ष लागवड (Tree planting) केले होते.
सध्या पावसाने दांडी मारल्यामुळे भरपूर ऊन असल्यामुळे झाडे (tree) जगवण्यासाठी सैनिक असोसिएशन चे माजी सैनिक स्वतः बादली घेऊन झाडांना पाणी घालत आहेत. देशसेवेबरोबर समाजकार्यात अग्रेसर असणारे सैनिक असोसिएशन नेहमी सामाजिक बांधिलकी जपत आलेली आहे.
जिथून पाणी मिळेल तिथून पाणी आणून झाडांना पाणी घालत आहेत. ऊन फार असल्यामुळे झाडांना पाण्याची फार आवश्यकता लागत आहे. मोहन निर्मळे यांची यांचे 13 ऑपरेशन झाले आहेत. तरीसुद्धा त्यांची वृक्ष (tree) जगण्यासाठी धडपड चालू आहे. तसेच दादा खोत हे सुद्धा माजी सैनिक असून नेहमी समाजकार्यात यांचा फार मोठा मोलाचा योगदान आहे.
यावेळी सैनिक असोसिएशनचे सर्वत्र कौतुक होत आहे. व यातून अनेकांना प्रेरणा मिळेल.