कुरुंदवाड येथे धारदार शस्त्राने खून
(crime news) धारदार शस्त्राने वार करून सुनील भीमराव चव्हाण (वय 55, रा. कुरुंदवाड) यांचा खून करण्यात आला. रविवारी सायंकाळी शेतात काम करत असताना अज्ञाताने त्यांच्यावर हल्ला केला. जखमी अवस्थेत नातेवाईकांनी त्यांना सांगली येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकार्यांनी सांगितले. याबाबत कुरुंदवाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, सुनील चव्हाण हे सायंकाळी पाचच्या सुमारास नृसिंहवाडी रस्त्यावरील शेतात गवत कापत होते. याचवेळी अज्ञाताने धारदार शस्त्राने त्यांच्यावर हल्ला केला. पायावर व कंबरेच्याखाली वार झाल्याने ते गंभीर जखमी झाले. माहिती मिळताच नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी अवस्थेत चव्हाण यांना उपचारासाठी सांगली येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकार्यांनी सांगितले. (crime news)
हल्ला कोणत्या कारणातून झाला आणि कोणी केला हे समजू शकले नाही. अज्ञाताविरुद्ध कुरुंदवाड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक रविराज फडणीस, उपनिरीक्षक सागर पवार यांनी तपास सुरू केला आहे. घटनास्थळी पोलिस उपाधीक्षक समीरसिंह साळवी, अप्पर पोलिस अधीक्षक यांनी भेट देऊन पाहणी केली.