अनिल कपूर यांना मोठा झटका, चाहते हैराण

(entertenment news) अनिल कपूर यांनी एक मोठा काळ बाॅलिवूड चित्रपटांमध्ये गाजवलाय. अनिल कपूर (Anil Kapoor) यांचा आता अॅनिमल हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल. या चित्रपटामध्ये अनिल कपूर हे महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. अॅनिमल या चित्रपटात रणबीर कपूर (Ranbir Kapoor) हा मुख्य भूमिकेत असणार आहे. अनिल कपूर हे काही दिवसांपूर्वीच द नाइट मॅनेजर या वेब सीरिजमध्ये दिसले. विशेष म्हणजे या वेब सीरिजला प्रेक्षकांनी उदंड असला प्रतिसाद हा नक्कीच दिलाय.

या वेब सीरिजचे जोरदार प्रमोशन करताना अनिल कपूर दिसले. अनिल कपूर हे सोशल मीडियावर कायमच सक्रिय दिसतात. अनिल कपूर यांची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही दिसते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना देखील अनिल कपूर हे दिसतात. अनिल कपूर हे त्यांच्या आगामी चित्रपटाच्या पोस्ट देखील सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात.

आता नुकताच अनिल कपूर यांचे इंस्टाग्राम अकाऊंट पाहून लोक हैराण झाल्याचे बघायला मिळतंय. इतकेच नाही तर चाहत्यांना देखील मोठा धक्का बसलाय. अनिल कपूर हे नेहमीच पोस्ट शेअर करतात. मात्र, नुकताच अनिल कपूर यांच्या सर्व पोस्ट इंस्टाग्राम अकाऊंटवरून डिलीट करण्यात आल्या आहेत. इतकेच नाहीतर त्यांचा फोटो देखील काढण्यात आलाय.

हा सर्व प्रकार पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसलाय. एकही पोस्ट अनिल कपूर यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर दिसत नाहीये. मात्र, अनिल कपूर यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरील पोस्ट त्यांनीच डिलीट केल्या की, त्यांचे अकाऊंट हॅक झाले, याबद्दल फार काही माहिती ही कळू शकली नाहीये. मात्र, सर्वचजण हैराण झाले. (entertenment news)

विशेष म्हणजे अनिल कपूर यांची लेक आणि बाॅलिवूड अभिनेत्री सोनम कपूर हिला देखील या प्रकारानंतर धक्का बसल्याचे दिसतंय. सोनम कपूर हिने एक स्क्रीनशॉट शेअर करत थेट डॅड!!?? असे लिहिले. सोनम कपूर हिच्या पोस्टवरून हे दिसतंय की, अनिल कपूर यांना देखील याबद्दल माहिती नाहीये. अनिल कपूर यांचे इंस्टाग्राम अकाऊंट हॅक झाल्याची जोरदार चर्चा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *