‘बिग बॉस 17’ मधील हे सदस्य सलमान खान याच्या निशाण्यावर, थेट करणार पोलखोल

(entertenmenet news) बिग बॉस 17 धमाका करताना दिसतंय. बिग बॉस 17 (Bigg Boss 17) मध्ये मोठा हंगामा बघायला मिळतोय. बिग बॉस 17 ला सुरू होऊन आज सहा दिवस झाले. मात्र, यादरम्यान घरामध्ये मोठे हंगामे बघायला मिळाले. बिग बॉस 17 ची चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ आहे. बिग बॉस (Bigg Boss) 17 च्या प्रिमियरला सलमान खान हा धमाकेदार डान्स (Dance) करताना दिसला. बिग बॉस 17 च्या घरात मोठे भांडणे होताना दिसत आहेत. बिग बॉस 17 मध्ये आरोप प्रत्यारोपाचे सत्र देखील सुरू आहे.

बिग बॉस 17 चा पहिला विकेंडचा वार बघायला मिळणार आहे. विशेष म्हणजे या आठवड्यात घरात अनेक गंभीर भांडणे झाली. आता याचाच सलमान खान हा समाचार घेण्यास तयार आहे. बिग बॉस 17 च्या विकेंडच्या वारमध्ये सलमान खान हा अभिषेक कुमार याचा क्लास लावताना दिसणार आहे. कारण घरातील बऱ्याच लोकांना कारण नसताना देखील अभिषेक कुमार हा भांडताना दिसला.

इतकेच नाही तर कालच्या भागामध्ये बिग बॉस 17 च्या घरात नील भट्ट आणि विकी जैन यांच्यामध्ये जोरदार भांडणे झाली. दोघेही एकमेकांच्या अंगावर जाताना दिसले. ही भांडणे खरी सोनिया बंसल खानजादी हिने सुरू केली. अगोदर सोनिया बंसल खानजादी ही अभिषेक कुमार याच्यासोबत वाद घालताना दिसली, काहीही कारण नसताना.

त्यानंतर सोनिया बंसल खानजादी हिने अंकिता लोखंडे हिला टार्गेट करण्यास सुरूवात केली. ही भांडणे संपत नाहीत तोपर्यंत नील भट्ट आणि विकी जैन यांच्यामध्ये जोरदार भांडणे झाली. अगोदर विकी जैन हा नील भट्ट याच्या अंगावर जाताना दिसला. त्यानंतर थेट दोघेही एकमेकांना मारण्यासाठी धावत असल्याचे बघायला मिळाले. (entertenmenet news)

आता विकेंडच्या वारमध्ये सलमान खान हा ईशा हिच्यावर भडकताना दिसतो. इतकेच नाही तर सलमान खान हा ईशा हिला दुहेरी भूमिका घेत असल्याचे म्हणताना देखील दिसतोय. रिपोर्टनुसार सलमान खान विकेंडच्या वारमध्ये अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांना सपोर्ट करताना दिसणार आहे. अंकितावर काही घरातील सदस्यांनी गंभीर आरोप केल्याने मोठा वाद हा बघायला मिळाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *