साखर कारखानदारांत उडाली खळबळ
यंदाचा गळीत हंगाम पंधरा दिवसांवर येऊन ठेपला असतानाच राज्यातील 45 साखर कारखान्यांना केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोटिसा धाडल्या आहेत. त्यामुळे साखर कारखानदारांत खळबळ उडाली आहे.
ऊस क्षेत्र घटल्याने कारखाने (Factory) अडचणीत सापडले आहेत. त्यातच पर्यावरण संरक्षण कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल कारखानेच बंद करण्याचे आदेश आले आहेत. राज्यात 190 साखर कारखाने असून त्यापैकी 105 कारखाने पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत. पर्यावरण संरक्षण कायद्याच्या कलम 5 अंतर्गत केंद्राला निर्देश देण्याचे अधिकार आहेत ज्यात एखाद्या आस्थापनाचे ऑपरेशन किंवा प्रक्रिया बंद करणे, वीज आणि पाणीपुरवठा किंवा इतर कोणत्याही सेवेचा पुरवठा थांबवणे किंवा नियमन करणे समाविष्ट आहे.
मंडळाला या 45 साखर कारखान्यांची (Factory) तपासणी आणि पडताळणी करण्याच्याही सूचना दिल्या आहेत. त्यामुळे साखर कारखानदारांमध्ये खळबळ उडाली आहे. आधीच साखर उद्योग अनंत अडचणींतून मार्गस्थ होत असतानाचा केंद्रीय प्रदूषण मंडळाच्या या नोटिसीमुळे खळबळ उडाली आहे.