प्रियांका चोप्रा मुंबईत दाखल, अभिनेत्रीचा ‘तो’ खास व्हिडीओ व्हायरल

(entertenment news) प्रियांचा चोप्रा ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. नुकताच प्रियांचा चोप्रा ही मुंबईत दाखल झाली. सोशल मीडियावर तिने काही खास फोटोही शेअर केले. पापाराझी यांना फोटोसाठी खास पोज देताना प्रियांचा चोप्रा दिसली. प्रियांचा चोप्रा हिने गळ्यात घातलेल्या पेंडेंटची जोरदार चर्चा ही रंगताना दिसतंय. प्रियांका चोप्रा हिने लेक मालती हिच्या नावाचे खास पेंडेंट घातले आहे. यावरून हे कळते की, मालतीवर प्रियांका किती प्रेम करते.

प्रियांचा चोप्रा हिने फक्त बाॅलिवूडमध्येच नाही तर हाॅलिवूडमध्ये देखील नाव कमावले आहे. प्रियांका चोप्रा ही गेल्या काही वर्षांपासून पती निक जोनस आणि मुलगी मालती मेरी हिच्यासोबत विदेशात राहते. मात्र, असे असतानाही प्रियांका चोप्रा आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी खास फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसते.

प्रियांका चोप्रा ही काही दिवसांपूर्वीच मुलगी मालती मेरी हिच्यासोबत धमाल करताना दिसली. प्रियांका चोप्रा हिने खास फोटो शेअर केले. या फोटोमध्ये मालती ही तिच्या मित्रांसोबत खेळताना दिसली. प्रियांका चोप्रा ही फार कमी वेळा भारतामध्ये येते. नुकताच आता प्रियांका चोप्रा ही जियो मामी फिल्म फेस्टिवलसाठी भारतामध्ये आलीये.

प्रियांका चोप्रा हिचा विमानतळावरील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. पापाराझी यांना पाहून हात जोडताना देखील या व्हिडीओमध्ये प्रियांका चोप्रा दिसतंय. यासोबतच प्रियांका चोप्रा हिने मुंबईमध्ये फिरताना देखील दिसत आहे. इंस्टा स्टोरीवर प्रियांका चोप्रा हिने काही अत्यंत खास फोटो हे शेअर केले आहेत. (entertenment news)

काही दिवसांपूर्वीच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अत्यंत मोठे खुलासे करताना प्रियांका चोप्रा दिसली. इतकेच नाही तर प्रियांका चोप्रा हिने बाॅलिवूडवर अनेक गंभीर आरोप केले. प्रियांका चोप्रा हिने सांगितले कशाप्रकारे तिला चित्रपटांमध्ये घेतले जात नव्हते. तसेच तिने सांगितले की, बाॅलिवूडमध्ये मोठे राजकारण हे सुरू आहे. थोडक्यात काय तर प्रियांका चोप्रा हिने बाॅलिवूडमधील काळे सत्य सांगण्याचा प्रयत्न केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *