सलमाननं कर्नाटक अन् राजस्थानमधील शेतकऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय

(entertenment news) बॉलीवूडचा भाईजान म्हणून सलमान खान ओळखला जातो. त्याचा केवळ भारतातच नाहीतर जगातील विविध देशांमध्ये चाहतावर्ग आहे. सलमान हा त्याच्या हटके स्टाईल आणि स्वॅगसाठी ओळखला गेलेला अभिनेता आहे. आता सलमान एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आला आहे.

सलमान हा जसा त्याच्या आक्रमक आणि तापट स्वभावासाठी प्रसिद्ध आहे तसाच तो त्याच्या दानशूरपणासाठीही ओळखला जातो. त्यानं त्याच्या बिइंग ह्युमन या संस्थेमार्फत कित्येक संस्थांसाठी काम केले आहे. त्यातून त्यानं मनाचा मोठेपणा दाखवत मोठमोठ्या प्रमाणात दानधर्मही केल्याचे सांगितले जाते. आता तो शेतकऱ्यांसाठी धावून आला आहे. त्याच्या संस्थेसाठी जे काही केले त्याची चर्चा होताना दिसत आहे.

बिईंग ह्युमन नावाची संस्था ही गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा आणि आरोग्याची जबाबदारी घेते. याच नावानं एक मोठा कपड्याचा ब्रँड देखील आहे. आता सलमानच्या या संस्थेनं कापसाचे उत्पादन घेणाऱ्या २५ हजार शेतकऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. अमर उजालानं याविषयी अधिक माहिती दिली आहे. मुंबईमध्ये आयोजित एका कार्यक्रमामध्ये सलमानची बहिण आणि बिईंग ह्युमन क्लॉथिंगची मुख्य अलवीरा खान हिनं फेयर ट्रेड सोबत एक करार केल आहे.

या निर्णयाचा फायदा कर्नाटक आणि राजस्थानमधील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्या शेतकऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्या जात आहे. (entertenment news)

फेयर ट्रेड ही एक आंतरराष्ट्रीय संस्था असून जी शेतकऱ्यांशी जोडली गेली आहे. याबाबत अधिक माहिती देताना अलवीरा म्हणाली की, आपले कपडे हे कापसापासून तयार होतात. आम्ही घेतलेल्या या निर्णयाचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे याचा आनंद आहे. त्यातून त्यांची आर्थिक स्थिती आणखी सक्षम होण्यास मदत होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *