भाजपाला मोठा धक्का! पुढील काही आठवड्यात….

(political news) मध्य प्रदेशात काँग्रेस आणि भाजपा दोन्ही पक्ष विधानसभा निवडणुकीत आपण विजयी होऊ असा दावा करत आहेत. मध्य प्रदेशात 17 नोव्हेंबरला मतदान होणार असून, 3 डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहेत. यादरम्यान मध्य प्रदेशातील ओपिनियन पोल समोर येत आहेत. ZEE मध्य प्रदेश/छत्तीसगडनेही एक ओपिनियन पोल केला आहे. ZEE NEWS-C FOR SURVEY च्या या सर्व्हेनुसार, 11 हजार 500 हून अधिक लोक या सर्व्हेत सहभागी झाले होते. 28 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर दरम्यान हा सर्व्हे करण्यात आला.

ओपिनियन पोलमध्ये कमलनाथ यांच्या नेतृत्वातील काँग्रेस पक्ष बाजी मारताना दिसत आहे. सर्व्हेनुसार, काँग्रेसला 46 टक्के मतं मिळू शकतात. भाजपाला 43 टक्के मतं मिळण्याचा अंदाज आहे. इतरांच्या खात्यात 11 टक्के मतं जातील असं दिसत आहे.

कोणाला किती जागा?

सर्व्हेनुसार, मतांच्या टक्केवारीत काँग्रेस आणि भाजपा यांच्यात 3 टक्क्यांचा फरक दिसत आहे. पण जागांबद्दल बोलायचं झाल्यास काँग्रेस फार पुढे आहेत. मध्य प्रदेशातील एकूण 230 विधानसभा जागांपैकी काँग्रेसला 132 ते 146 जागा मिळतील असा अंदाज आहे तर भाजपाला फक्त 84 ते 98 जागांवर समाधान मानावं लागणार आहे. इतरांच्या खात्यात 0 ते 5 जागा जातील.

निवडणुकीच्या दृष्टिकोनातून मध्य प्रदेश 7 विभागात विभागला गेला आहे. भोपाळ, निमार, माळवा, महाकौशल, ग्वाल्हेर-चंबळ, बुंदेलखंड आणि बघेलखंड. भोपाळ आणि माळवा वगळता सर्वच प्रदेशात भाजपची पिछेहाट दिसत आहे.

सर्वेक्षणानुसार, भोपाळ विभागातील 26 जागांपैकी काँग्रेसला 6-8 जागा आणि भाजपला 18-20 जागा मिळू शकतात. माळव्यातील 53 जागांपैकी भाजपला 28-30 तर काँग्रेसला 23-25 ​​जागा मिळू शकतात. पण हे केवळ मत सर्वेक्षणाचे आकडे आहेत. मतदानाचा निकाल यापेक्षा वेगळा असू शकतो. (political news)

कोणत्या भागात कोणाच्या किती जागा?

बघेलखंड (25 जागा) – काँग्रेस 17-19, भाजप 6-8, इतर 0

बुंदेलखंड (26 जागा): काँग्रेस 16-18, भाजप 8-10, इतर 0-1

ग्वाल्हेर-चंबळ (34 जागा): काँग्रेस 24-26, भाजप 8-10, इतर 0-1.

महाकौशल (48 जागा): काँग्रेस 34-36, भाजप 12-14, इतर 0-1

माळवा (53 जागा): काँग्रेस 23-25, भाजप 28-30, इतर 0-1

निमार (18 जागा): काँग्रेस १२-१४, भाजप ४-६, इतर ०-१.

भोपाळ (२६ जागा): काँग्रेस ०६-०८, भाजप १८-२०, इतर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *