शिवाजी पार्कमधील मरीन झू पुन्हा चर्चेत

(crime news) दादरच्या शिवाजी पार्क एरियामध्ये असलेले मरीन झू (zoo) पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. या मरीन ॲक्वा झू मधून प्राण्यांची चोरी (animals stolen) झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. चोरीला गेलेल्या प्राण्यांमध्ये विदेशी प्रजातींचे अजगर, घोरपडी, पाल आणि सरडा या प्राण्यांचा समावेश आहे. त्यांची किंमत सुमारे साडेचार लाख रुपये असल्याची माहिती मिळत आहे.

झू मधून प्राणी अचानक चोरी झाल्याने एकच खळबळ उडाली असून याप्रकरणी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच हे प्राणी संग्राहालय तात्पुरते बंद असणार असल्याच फलक देखील लावण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चोरीला गेलेल्या प्राण्यांमध्ये विदेशी प्रजातींचे ६ अजगर, २ घोरपडी, १ पाल आणि सरडा या प्राण्यांचा समावेश आहे. हे प्राणी प्रदर्शनासाठी सोमय्या विद्याविहार कॉलेज कॅम्पसमध्ये नेण्यात येणार होते, अशी माहिती मरीन ॲक्वा झू च्या विश्वस्तांनी दिली. मात्र त्यापूर्वीच ते चोरीला गेल्याने गदारोळ माजला आहे. याप्रकरणी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून चोरीला गेलेल्या प्राण्यांचा कसून शोध घेण्यात येत आहे.

दरम्यान या झू मधील कथित अनधिकृत बांधकामावरती पालिकेने सोमवारी कारवाई केली होती. झू मधील अनधिकृत बांधकाम तोडण्यात आलं होतं. मात्र प्राणी संग्रहालया वरील कारवाई मागे राजकीय सूडबुद्धी असल्याचा आरोपी प्राणी संग्रहालय प्रशासनाने केला होता. (crime news)

प्राणी संग्रहालयातून मगरीचं पिल्लू झालं होतं गायब

गेल्या महिन्यात हे प्राणी संग्रहालय बरंच चर्चेत आलं होतं. कारण त्यामधील मगरीचं एक पिल्लू गायब झालं आणि ते शेजारी असलेल्या पालिकेच्या स्वीमिंग पूलमध्ये आढळलं होतं. याबाबत स्वीमिंग पूल आणि थिएटरचे को-ऑर्डिनेचर संदीप वैशंपायन यांनी अधिक माहिती दिली. हा स्वीमिंग पूल रोज सकाळी मेंबर्ससाठी खुला करण्यापूर्वी संबंधित कर्मचाऱ्यांकडून त्याची बारकाईने पाहणी केली जाते, तसेच सफाईही होते.

नेहमीप्रमाणे त्या दिवशीही 5.30 वाजण्याच्या सुमारास स्वीमिंग पूलची पाहणी केली असता, कर्मचाऱ्यांना पाण्यामध्ये मगरीचं एक छोटं पिल्लू आढळलं. त्यानंतर तज्ज्ञांच्या मदतीने तातडीने कारवाई करत या पिल्लाला सुखरूप पकडण्यात आले. हे पिल्लू वनविभागाच्या ताब्यात देण्यात आलं. मात्र त्या घटनेनेही खळबळ उडाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *