“….तर, कारखानदारांची दिवाळी गोड होऊ देणार नाही”
छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलेल्या गनिमी काव्याचा उपयोग करून कारखानदारांना गुडघे टेकायला लावून मागील हंगामातील बाराशे कोटी रुपये वसूल केल्याशिवाय गप्प बसणार नाही. शेतकऱ्यांची (farmer) दिवाळी गोड झाली नाही तर, कारखानदारांची दिवाळी गोड होऊ देणार नाही’, असे प्रतिपादन माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले.
ते येथे आक्रोश पदयात्रेच्या सभेत बोलत होते. यावेळी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस शिवाजी पाटील, वैभव कांबळे, बाबूराव बाबर, राजकुमार मगदूम, सरपंच अभिजीत चव्हाण, सचिन पाटील, सुनील बामणे प्रमुख उपस्थित होते.
काही दिवसांपूर्वी स्थगित केलेल्या आक्रोश पदयात्रेला पुन्हा सुरुवात झाली आहे. आज विसाव्या दिवशी सांगली जिल्ह्यातील दुधगावमधून पदयात्रे कोल्हापूर जिल्ह्यातील खोची येथे आली. शेट्टी म्हणाले,‘आजपर्यंत ३५ कारखान्यांची परिक्रमा पूर्ण झाली आहे. या कारखान्यांना निवेदन दिले आहे. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील ३७ कारखान्यांच्याकडून गेल्या हंगामात तीन कोटी टन उसाचे गाळप केले आहे.
या गाळप उसाचे चारशे रुपये प्रमाणे शेतकऱ्यांचे (farmer) बाराशे कोटी रुपये कारखानदारांकडे थकीत आहेत. साखर कारखानदार मात्र वार्षिक सभेचे कारण पुढे करून हिशोब संपला असल्याचे सांगत आहेत. परंतु ३१ मार्च पर्यंत सर्व साखर कारखान्याची जवळपास ६५ ते ७० टक्के साखर विक्री केली गेली नव्हती.
एप्रिल ते ऑक्टोबर यादरम्यान ही साखर ३४०० ते ३८०० रुपये दराने विक्री केली गेली आहे. त्यामुळे कारखानदारांना उसाचे किमान साडेपाचशे ते सहाशे रुपये जादा आले आहेत. त्यातील चारशे रुपये शेतकऱ्यांसाठी मागत आहोत.’ स्वागत वैभव कांबळे यांनी केले. आभार शिवाजी पाटील यांनी मानले.