सनी लिओनीची पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत

(entertenment news) आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने आज प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या सनी लिओनी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. बोल्डनेसमुळे चर्चेत असणारी अभिनेत्री आज वैयक्तिक कारणामुळे चर्चेत आली आहे. सनीचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत. नुकतीच सनीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. जी सध्या चांगलीच व्हायरल होत आहे. खरंतर ही पोस्ट पाहून थोडेसे हैराण झाल्याचंही दिसत आहेत. खरंतर अभिनेत्री एका चिमुकलीच्या मदतीला धावून गेलीये हे पाहून तिचे चाहते तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.

इन्स्टाग्रामवर अनुष्का मोरे या चिमुकलीचा फोटो शेअर करत ही चिमुकली बेपत्ता असल्याचं सनीने पोस्टव्दारे सांगितलंय, एवढंच नव्हेतर या चिमुकलीला शोधणाऱ्याला सनी लिओन ५० हजार रुपयांचा इनामही देणार आहे. असं तिने या पोस्टच्या माध्यामातून सांगितलं आहे. बेपत्ता असलेली अनुष्का ९ वर्षांची आहे. या फोटोसोबतच तिचं वय, तिचा पत्ता आणि तिचा फोन नंबरही देण्यात आला आहे. काल संध्याकाळपासून अनुष्का बेपत्ता आहे. सनीने सांगितलं की, अनुष्काला शोधून देणाऱ्याला ५० हजार रुपयांचा इनाम बक्षिस म्हणून देण्यात येईल. सनी ही पोस्ट मुंबई पोलिस आणि बीएमसीला देखील टॅग केला आहे.

काय आहे सनी आणि अनुष्काचं नातं?

सनी लिओनीने आपल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये सांगितलं की, अनुष्का तिच्या घरकाम करणाऱ्याची मुलगी आहे. आणि काल संध्याकाळपासून ती बेपत्ता आहे. सनीने पुढे सांगितलं की, ८ नोव्हेंबर जवळपास ७ वाजण्याच्या जवळपास जोगेश्वरी वेस्ट बहराम बाग मुंबईमधून बेपत्ता झाली आहे. अनुष्काच्या हरवण्यामुळे तिच्या आई-वडिलांची खूप वाईट अवस्था आहे. याचबरोबर कॅप्शनमध्ये फोन नंबरही देण्यात आला आहे. जेणेकरुन अनुष्काची माहिती दिलेल्या फोन नंबरवर तुम्ही देवू शकता. सनीने असंही सांगितलं की, अनुष्काच्याही परिवाराकडून ११ हजारांचं बक्षिस दिलं जाणार आहे. जो कोणी अनुष्काला शोधून देईल किंवा तिची माहिती पोलिसांना देईल. (entertenment news)

अनेकजण सनी लिओनच्या या पोस्टवर कमेंट्सचा वर्षाव करुन अभिनेत्रीचं कौतुक करत आहेत. एका चाहत्याने कमेंट करत लिहीलंय की, लवकरच मिळेल. तर अजून एकाने म्हटलंय, गुड जॉब सनी लिओनी जी मात्र हा जमाना आपल्याला वेगळ्याच प्रकारे जज करतं. याचबरोबर अजून एकाने लिहीलंय, देवा प्लिज ही मुलगी भेटू देत. अशा प्रकारच्या अनेक कमेंट युजर्स या फोटोवर करत आहेत. याचरोबर अनेकांनी या फोटोवर हार्ट ईमोजी पाठवले आबेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *