हृतिकचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चर्चांना उधाण
(entertenment news) अभिनेता हृतिक रोशन याने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण गेल्या काही दिवसांपासून अभिनेता त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. पहिली पत्नी सुझान खान हिला घटस्फोट दिल्यानंतर अभिनेत्याच्या आयुष्यात सबा आझाद हिची एन्ट्री झाली. महत्त्वाची गोष्ट म्हणजे लग्नाआधी आणि लग्नानंतर देखील हृतिक रोशन याचं नाव अनेक अभिनेत्रीसोबत जोडण्यात आलं. सध्या सोशल मीडियावर हृतिक याचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहे.
व्हिडीओमध्ये हृतिक गर्लफ्रेंड सबा आझाद हिच्यासोबत दिसत आहेत. सबा आणि हृतिक यांना पापाराझींनी विमानतळावर स्पॉट केलं. दोघांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर एक नेटकरी म्हणाला, ‘वडील आणि लेकीची जोडी..’, तर दुसरा नेटकरी, ‘प्रत्येक मुलीचा वापर केल्यानंतर त्यांना सोडून देतो..’ असं म्हणाला आहे.
सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त हृतिक आणि सबा यांच्या जोडीची चर्चा रंगत आहे. सांगायचं झालं तर, हृतिक याच्या नावाची चर्चा अभिनेत्री कंगना रनौत हिच्यासोबत देखील झाली होती. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. हृतिक आणि कंगना यांच्या नात्याच्या चर्चा जेव्हा रंगल्या तेव्हा अभिनेता विवाहित होता.
सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त हृतिक रोशन याच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे सबा हिचं रोशन कुटुंबात येणं-जाणं देखील वाढलं आहे. एवढंच नाही तर, दोघांच्या लग्नाच्या चर्चांनी देखील जोर धरला आहे. सोशल मीडियावर देखील हृतिक – सबा यांचे फोटो आणि व्हिडींओ व्हायरल होत असतात. (entertenment news)
हृतिक देखील सबा हिच्यासोबत फोटो पोस्ट करत सोशल मीडियावर प्रेम व्यक्त करताना दिसतो. हृतिक आणि सबा यांची जोडी काही चाहत्यांना आवडते, काही मात्र दोघांच्या नात्याला विरोध करतात. सबा आणि हृतिक यांच्यामध्ये 17 वर्षांचं अंतर आहे. दोघांना त्याच्यात असलेल्या वयाच्या अंतरावरुन देखील ट्रोल केलं जातं.
सबा देखील सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. हृतिक याची गर्लफ्रेंड म्हणून आज सबा हिने अनेक जण ओळखतात. सबा चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.