ऍनिमलमध्ये रणबीर-रश्मिकाच्या सीन्सवर सेन्सर बोर्डाची कात्री, ‘या’ शब्दावरही आक्षेप

(entertenment news) रणबीर कपूर आणि रश्मिका मंदाना स्टारर सिनेमा ऍनिमल अनाऊन्समेंटनंतर खूप चर्चेत आहे. हा सिनेमा एक डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. हल्लीच सेन्सर बोर्डाने या सिनेमाला A म्हणजे एडल्ट्स ओनली सर्टिफिकेट दिलं आहे. मात्र मिळालेल्या माहितीनुसार, सिनेमाच्या अनेक सीन्सवर बोर्डाने नाराजी व्यक्त केली आहे. आणि मेकर्स ते सीन्स काढण्याचे आदेश दिलेत. यामध्ये रणबीर आणि रश्मिकाच्या रोमँटिक सीन्सचा समावेश आहे.

सेन्सरची कात्री चालणार

संदीप वांगा रेडी यांनी दिग्दर्शक केलेल्या या सिनेमाची खूप चर्चा रंगली आहे. तसेच सिनेमाच्या मुख्य कलाकारांच्या रोमँटिक सीन्सची खूप चर्चा आहे. चाहते देखील या सिनेमा पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत. रिपोर्टनुसार, मेकर्सला पाच महत्त्वाचे बदल करण्याचे आदेश दिले आहेत. कलाकारांचे इंटीमेट सीन्स आणि लेंथ कमी करण्यास सांगितलं आहे. तसेच इतक काही सिन हटवण्याचे सल्ले दिले आहेत. यामध्ये TCR 02:28:37 मध्ये विजय आणि जोया यांचे इंटिमेट क्लोज अप शॉर्टस काढण्याचा सल्ला दिला आहे. (entertenment news)

या शब्दावर नाराजी

ऑनलाइन लिक झालेल्या रिपोर्टनुसार, विजय-जोया कॅरेक्टर्समध्ये अनेक इंटीमेट सीन्स सिनेमात आहे. तसेच संदीप वांगा रेडी यांनी रणबीर-रश्मिकाचे स्टीमी सीन्सचे हिंट ‘हुआ मै’ या गाण्यातून दर्शवले आहेत. तसेच सेंसर बोर्डाने मेकर्सला ‘वस्त्र’ या शब्दाला ‘कॉस्ट्यूम’ मध्ये बदलण्याचे आदेश दिलेत. पॉइंटर्सची ही कॉपी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

1 डिसेंबर रोजी होणार रिलीज

संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित हा चित्रपट 1 डिसेंबर 2023 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. या चित्रपटात रणबीर कपूरशिवाय रश्मिका मंदान्ना, बॉबी देओल आणि अनिल कपूर यांच्याही मुख्य भूमिका आहेत. अॅनिमलमध्ये रणबीर पहिल्यांदा ग्रे-शेड अवतारात दिसणार आहे. विकी कौशलचा सॅम बहादूर हा चित्रपटही १ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. अशा परिस्थितीत विकी कौशल आणि रणबीर कपूर (रणबीर कपूर अॅनिमल) यांच्या चित्रपटांमध्ये मोठी स्पर्धा होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *