अतिरेकी प्रेम एका तरूणीच्या जीवावर बेतलं

(crime news) प्रेमात आणि युद्धात सगळं काही माफ असतं असं म्हणतात. पण त्याचा अर्थ असा नाही की तु्म्हीही काहीह कराल आणि ते खपून जाईल. काही माणसं प्रेमात खरंच एवढी गुंततात, की ती आंधळी होतात. प्रेम मिळवण्यासाठी वाट्टेल त्या थराला जायची त्यांची तयारी असते. मात्र या सगळ्याला प्रेम म्हणता येत नाही, तो असतो अट्टाहास. आपल्याला जे हवं, ते मिळालंच पाहिजे. याच हट्टापायी काहीजण अशी कृती करतात, ज्यामुळे एखाद्या व्यक्तीचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतं. अशाच एका अतिरेकी प्रेमामुळे मुंबईत एका तरूणीच्या जीवावर बेतलं आहे.

लग्नाला नकार दिला म्हणून त्या तरूणीच्या प्रियकराने घरात घुसून तिच्यावर हल्ला केल्याची संतापजनक घटना मंगळवारी काळाचौकी येथे घडली आहे. या हल्ल्यामध्ये ती तरूणी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती अद्याप चिंताजनतक आहे. दरम्यान हा जीवघेणा हल्ला करणाऱ्या माथेफिरू इसमाला पोलिसांनी तातडीने अटक केली. समीर राऊत (वय 44) असे त्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी समीर राऊत याचे काळाचौकी परिसरात राहणाऱ्या एका 25 वर्षीय तरूणीसंबध प्रेमसंबंध होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून तिने राऊत याच्याशी बोलणं बंद केलं. राऊतने तिच्याशी संपर्क साधण्याचा खूप प्रयत्न केला, मात्र ती काही त्याला दाद देत नव्हती. राऊत याला त्या महिलेशी लग्न करण्याची इच्छा होती. त्याने तिला लग्नासाठी मागणीदेखील घातली होती. मात्र पीडित महिला काही दिवसांपासून त्याच्याकडे दुर्लक्ष करत होती. तिने त्याच्याशी बोलणं बंद केलं आणि लग्न करण्यासही नकार दिला. यामुळेच तो अतिशय संतापला होता. (crime news)

याच रागातून त्याने हे कृत्य केले. मंगळवारी दुपारी राऊत हा पीडत महिलेच्या घरी गेला आणि दरवाजा ठोठावला. तेव्हा घरी कोणीच नव्हते. तिने दार उघडताच राऊत याने खिशातून ब्लेड काढून पीडित तरूणीच्या मानेवर सपासप वार केले. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे पीडिता धाडकन खाली कोसळली, खूप रक्तस्त्राव होत होता. तिचा आरडाओरडा ऐकून शेजारच्या लोकांनी मदतीसाठी धाव घेतली आणि धावपळ करत कसेबसे तिला लगेचच जवळच्या रुग्णालयात दाखल केले. सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत, मात्र तिची प्रकृती अद्याप चिंताजनक आहे.

दरम्यान या हल्ल्यानंतर शेजारच्या लोकांनी या घटनेची माहिती पोलिसांना कळवली. तातडीने घटनास्थळी पोहोचून पोलिसांनी आरोपी राऊत याला त्या परिसरातूनच बेड्या ठोकून अटक केली. त्याच्याविरोधात भादंवि कलम 307 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस त्याची कसून चौकशी करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *