श्री गुरुदत्त शुगर लि यांच्या वतीने अकिवाट गावामध्ये 3000 डस्टबिन वाटप

पत्रकार नामदेव निर्मळे :

(local news)  अकिवाट तालुका शिरोळ येथे ग्रामपंचायत ला श्री गुरुदत्त शुगर्स कडून 3000 हजार डस्टबिन वाटप करण्यात आले. स्वच्छतेकडे एक पाऊल असा उपक्रमास प्राधान्य देण्यात आले. ग्रामपंचायत चे घंटागाडी चे उद्घाटन करण्यात आले. नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे श्री गुरुदत्त शुगर चे नेहमी मोलाचे योगदान असते.

कोरोना असो किंवा महापूर असो नेहमी तळमळीने धावून येणारे श्री गुरुदत्त शुगर्स परिवार नेहमी सामाजिक बांधिलकी जपत आलेली आहे. गट,तट न बघता माणुसकी धर्म हा त्यांनी मानलेला आहे. समाजाशी नाळ त्यांची जोडली गेलेली आहे. ही नाळ न तुटण्यासारखी आहे. जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन श्री गुरुदत्त शुगर परिवार निस्वार्थपणे काम करत असतात.

श्री गुरुदत्त शुगर चेअरमन मा.माधवराव घाटगे तसेच एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर मा. राहुल दादा घाटगे ,तसेच मा. एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर धीरज घाटगे ,तसेच सर्व संचालक यांचा सामाजिक कार्यात मोठा हातभार आहे. स्वागत व प्रास्ताविक गणपती कागे यांनी केले. मनोगत माजी जिल्हा परिषद सदस्य इकबाल वैरागदार आभार सुहास पाटील यांनी केले. सर्वत्र गावांमध्ये यांचे कौतुक होत आहे. (local news)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *