5 वर्षांत 15 हजार कोटींची फसवणूक

दामदुप्पटीचा हव्यास, कमी काळात दामदुप्पट, तिप्पट नव्हे, तर चारपटही शिवाय गुंतवणुकीवर आलिशान कार, महागड्या दुचाकींचे गिफ्ट, फॅमिलीसमवेत फॉरेन टूर आणखी बरेच काही, प्रचंड भूलभुलैया… घसघशीत परतावा म्हणजे सोन्याचे अंडे देणारी कोंबडीच समजली जाते. जिल्ह्यात फसव्या कपन्यांचे अक्षरश: पेव फुटले आहे. कंपन्यांची सत्यता पडताळणी न करताच गुंतवणुकीसाठी रांगा लागल्याचे चित्र आहे. दामदुप्पटीवर गुंतवणूक केलेल्या हजारो गुंतवणूकदारांना 5 वर्षांत 15 हजार कोटींच्या रकमेवर पाणी सोडावे लागले आहे. (fraud)

‘झुकती है दुनिया, झुकानेवाला चाहिए…’ या युक्तीचा प्रत्यय पश्चिम महाराष्ट्रात अनुभवाला येत आहे. अलीकडच्या काळात कोल्हापूरसह ग्रामीण भागात देश-विदेशातील शेकडो बोगस कंपन्यांचे अक्षरश: पेव फुटले आहे. शहर, जिल्ह्यात फसवणुकीच्या अनेक घटना चव्हाट्यावर येत असतानाही दामदुप्पट परताव्याच्या बहाण्याने गुंतवणुकीचा सिलसिला मात्र अजूनही कायम आहे.

फसवणुकीच्या 22 गुन्ह्यांचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे

शहरासह जिल्ह्यात पाच-सात वर्षांत दुकानदारी थाटलेल्या ए. एस. ट्रेडर्ससह शंभरावर कंपन्यांनी कोट्यवधीच्या उलाढाली करून रातोरात गाशा गुंडाळला आहे. त्यापैकी 75 पेक्षा जादा कंपन्यांच्या पदाधिकार्‍यांसह संचालक, एजंटांविरुद्ध जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले आहेत. त्यापैकी 22 गुन्ह्यांचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आलेला आहे.

फसवणूक होऊनही लोकप्रतिनिधींचे मौन, सर्वच मंडळी चिडीचूप

जिल्ह्यात अनेक बोगस कपन्यांचे पेव फुटलेले असताना किंबहुना अलीकडच्या काळात 5 वर्षांत सुमारे 15 हजार कोटींपेक्षा अधिक रकमेची गुंतवणूकदारांची फसवणूक झालेली असतानाही सामाजिकस्तरावर कमालीची शांतता दिसून येत आहे. फसवणूक केलेल्या कंपन्यांविरोधात कोणीही पुढे येत नाही. राजकीय मंडळीही चिडीचूप आहेत. लोकप्रतिनिधींचे मौन आहे.

कोल्हापूर जिल्ह्यामधील 5 वर्षांतील फसवणुकीच्या दाखल ठळक घटना

पोलिस ठाणे फसवणुकीची रक्कम संशयित गुन्ह्याचे स्वरूप
शाहूपुरी 49 कोटी 46 लाख 32 ए. एस. ट्रेडर्स (जादा परतावा)
राजारामपुरी 30 कोटी 5 वेल्थ शेअर (जादा परतावा)
शाहूपुरी 26 कोटी 23 मेकर अ‍ॅग्रो कंपनी
हातकणंगले 2 कोटी 67 लाख 4 कापड व्यवहार
शाहूपुरी 11 कोटी 53 मालमत्ता खरेदी-विक्री
गांधीनगर 13 कोटी 92 लाख 6 क्रिप्टो करन्सी
इचलकरंजी 12 कोटी 38 लाख 7 क्रिप्टो करन्सी फसवणूक (fraud)
( जीडीसीसी कंपनी)
मुरगूड 2 कोटी 79 लाख 5 शेअर ट्रेडिंगच्या
नावाखाली फसवणूक
शाहूपुरी 1 कोटी 9 लाख 6 शेअर ट्रेडिंग / जादा परतावा
शिवाजीनगर 9 कोटी 47 लाख 13 बँक अपहार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *