कोल्हापूरात प्रचंड तणाव; मोठा फौजफाटा तैनात
(crime news) शहरातील मध्यवर्ती उमा टॉकीज चौक परिसरात रविवारी रात्री उशिरा दोन गटांत जोरदार राडा झाला. दगडफेक आणि काठ्यांनी केलेल्या मारहाणीत दोघे किरकोळ जखमी झाले. या घटनेमुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला. त्यानंतर तेेथे पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला.
उमा टॉकीज चौक आणि परिसरात दोन कुटुंबांतील तरुणांचे दोन गट समोरासमोर उभे ठाकलेे. काही वेळानंतर त्यांच्यात वादावादीला सुरुवात झाली. त्याचे पर्यवसान मारामारीत झाले. त्यांच्याकडून दगडफेक सुरू झाल्याने चौकात प्रचंड तणाव निर्माण झाला. यामुळे नागरिकांसह वाहनधारकांची तारांबळ उडाली.
या घटनेनंतर जुना राजवाडा आणि लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे पोलिसही घटनास्थळी आले. त्यांनी जमावावर सौम्य लाठीमार केला. दरम्यान, दगडफेक झाल्याचा पोलिसांनी इन्कार केला. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेऊन समज देऊन सोडण्यात आले. (crime news)