राजू शेट्टी दोन दिवसांत शिवसेना नेत्यांना भेटणार
हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचा (political party) पाठिंबा मिळविण्याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी येत्या दोन दिवसात शिवसेना नेत्यांना भेटणार आहेत.
शेट्टी यांनी महायुती व महाविकास आघाडीपासून समान अंतरावर राहून निवडणूक लढविण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मात्र त्यांनी शिवसेना (political party) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची पूर्वी भेट घेतली होती. तेव्हापासुन शेट्टी यांना शिवसेना पाठिंबा देणार याची चर्चा सुरू झाली. मात्र त्यानंतर शेट्टी यांच्याकडून कोणतीच हालचाल होत नसल्याचे पाहून शिवसेनेने या मतदारसंघातून सत्यजित पाटील सरूडकर यांची उमेदवारी जाहीर करण्याची तयारी केली आहे. दरम्यान, शेट्टी यांनी शिवसेना नेत्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र उद्धव ठाकरे दौर्यावर असल्याने शनिवारी किंवा रविवारी त्यांच्यात संपर्क होण्याची शक्यता आहे.