आता वारंवार केवायसी करण्याचे झंझट संपणार

कोणत्याही बँकेत नवीन खाते उघडायचे असो किंवा गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी KYC म्हणजे आपली ओळख पटवून द्यावी लागते. तर आधार कार्डमुळे मोबाईल नंबर मिळवणे आणि खाते उघडणे यासारख्या सेवांचा लाभ घेणे सोपे झाले आहे, परंतु केवायसी प्रक्रियेमुळे अजूनही लोकांना डोकेदुखी होते. अशा परिस्थितीत, कदाचित केवायसीचा त्रास टाळता येऊ शकतो कारण भारत सरकार लवकरच या प्रक्रियेत मोठा बदल करणार आहे.

FSDC म्हणजेच आर्थिक स्थिरता आणि विकास परिषदेने सरकारला देशभरात ‘युनिफॉर्म केवायसी’ लागू करण्याची शिफारस केली आहे, ज्यामुळे केवायसी प्रक्रिया सुलभ होण्याचे म्हटले जात आहे. आधार कार्ड सर्वसामान्यांमध्ये लोकप्रिय झाल्यापासून मोबाईल फोन नंबर मिळण्यापासून ते बँकेत खाते उघडण्यापर्यंत सर्व काही सोपे झाले आहे. तर लवकरच वारंवार ग्राहकांना (customer) KYC सबमिट करण्याचा होणारा त्रासही संपणार आहे.

केवायसी म्हणजे काय आणि युनिफॉर्म KYC कसं फायदेशीर?

केवायसी म्हणजे Know Your Customer. ही कोणत्याही व्यक्तीची ओळख पटवण्याची प्रक्रिया असून म्युच्युअल फंड, जीवन विमा, बँक खाते उघडणे आणि इतर अनेक ठिकाणी गुंतवणूक करण्यासाठी ग्राहकाला (customer) केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागते. अनेक ठिकाणी हे पुन्हा पुन्हा करावे लागते. या प्रक्रियेत अनेक प्रकारची कागदपत्रे मागितली जातात, ज्यात बराच वेळ आणि कागदपत्रे लागतात. ग्राहकांची ही अडचण लक्षात घेऊन FSDC ला एकसमान KYC सुरू करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. देशभरात युनिफॉर्म केवायसी लागू केल्यास आर्थिक क्षेत्रातील कोणत्याही सेवेसाठी, ग्राहकाला फक्त एकदाच केवायसी प्रक्रियेतून जावे लागेल.

इकॉनॉमिक टाइम्सच्या अहलवानुसार वित्त सचिव टीव्ही सोमनाथन यांच्या अध्यक्षतेखाली एक तज्ञ समिती स्थापन करण्यात आली आहे, जी युनिफॉर्म KYC संदर्भात नियमांची चौकट तयार करेल. FSDC सोबत नुकतीच एक बैठक झाली, ज्यादरम्यान अर्थमंत्र्यांनी KYC प्रक्रिया सुलभ करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

युनिफॉर्म KYC म्हणजे काय

आर्थिक स्थिरता आणि विकास परिषदेने (FSDC) संपूर्ण आर्थिक क्षेत्रासाठी एकच कायम पद्धत लागू करण्याचा प्रस्ताव डायल आहे.
आधार, पॅन आणि इतर महत्वाची कागदपत्रे लोकांना एकदाच जमा करावी.
त्याआधारे विविध संस्थांना ग्राहकाच्या परवानगीने ही माहिती पुरवली जावी
केवायसी प्रक्रिया संपूर्णतः कागदविरहीत करण्याचा प्रयत्न आहे जेणेकरून पेपरलेस प्रणाली विकसीत होईल
केवायसी प्रक्रिया झटपट होईल तसेच कागदपत्रे आणि अनावश्यक फाईलींचा बोजाही कमी करता येईल
अर्थसचिव टी.व्ही. सोमनाथन यांच्या अध्यक्षतेखाली एक तज्ज्ञ समितीची स्थापना करण्यात आली आहे.

युनिफॉर्म केवायसी कसं काम करेल?

सध्या बँक खाते उघडण्यापासून ते गुंतवणूक करण्यापर्यंत प्रत्येक आर्थिक सेवेसाठी स्वतंत्र केवायसी प्रक्रियेतून जावे लागते. तर नव्या प्रणालीत ग्राहकाला १४ अंकी CKYC क्रमांक दिला जाईल. सेबी व्यतिरिक्त आरबीआय, आयआरडीएआय आणि पीएफआरडीएला ग्राहकांचे केवायसी रेकॉर्ड सर्वत्र दिले जाईल ज्यामुळे सर्वत्र केवायसी करण्याच्या त्रासापासून वाचवेल कारण तुमची महत्त्वाची माहिती सीकेवायसी क्रमांकाद्वारे सर्व संस्थांपर्यंत पोहोचेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *