सध्या सर्वत्र चर्चा विजय वर्मा आणि सारा अली खान यांची

(entertenment news) अभिनेता विजय वर्मा आणि अभिनेत्री सारा अली खान सध्या आगामी ‘मर्डर मुबारक’ सिनेमामुळे चर्चेत आहेत. सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर नेटफ्लिक्सवर चाहत्यांना पाहता येणार आहे. सिनेमात सारा आणि विजय यांचे इंटिमेट सीन आहेत. म्हणून दोघांमधील केमिस्ट्रीची चर्चा गेल्या काही दिवसांपासून चाहत्यांमध्ये सुरु आहे. सिनेमा हॉरर थ्रिलर असल्यामुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत, विजय वर्मा याने सारा अली खान हिच्यासोबत दिलेल्या इंटिमेट सीनबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. विजय म्हणाला, ‘सिनेमाची कथा रोमान्स, हॉरर थ्रिलर भोवती फिरताना दिसत आहे. सिनेमाच्या सेटवर मी सारा पूर्णपणे वेगळे होतो. आम्ही एकमेकांसोबत मस्ती,, मस्करी करत होतो… त्यामुळे मला कधीच वाटलं नव्हतं आमच्यात सिझलिंग केमिस्ट्री दिसू शकते. पण एखाद्या पॅशनेट सीनमध्ये…’

पुढे अभिनेता म्हणाला, ‘जेव्हा मी विचार केला सारा पूर्णपणे तिच्या भूमिकेत गेली होती. तिने मला तिच्याजवळ खेचलं आणि आम्ही एक सिझलिंग सीन दिला… तेव्हा मला कळलं जेव्हा दोन कलाकार एकमेकांसोबत स्वतःला सुरक्षित समजतात तेव्हाच त्याच्यातील केमिस्ट्री पॅशनेट होते.’

‘आम्ही इंटिमेट सीन दिला आणि दुसऱ्या क्षणाला खास मित्रांप्रमाणे आमच्यात मस्ती सुरु झाली…’ असं विजय वर्मा म्हणाला. सांगायचं झालं याआधी विजय याने अभिनेता सैफ अली खान याची पत्नी करीना कपूर खान हिच्यासोबत ‘जाने जान’ सिनेमात इंटिमेट सीन दिले आहेत. आता सैफ अली खान याच्या मुलीसोबत दिलेल्या इंटिमेट सीनमुळे विजय चर्चेत आहे. सिनेमात करिश्मा कपूर देखील मुख्य भूमिकेत आहे.  (entertenment news)

‘मर्डर मुबारक’ सिनेमा

‘मर्डर मुबारक’ सिनेमात करिश्मा कपूर हिच्यासोबत सारा अली खान, पंकज त्रिपाठी यांसारखे सेलिब्रिटी मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. सिनेमाचं दिग्दर्शन होमी अदजानिया यांनी केलं आहे. सिनेमा 15 मार्च 2024 रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून सिनेमाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

सारा अली खान हिचे आगामी सिनेमे

सारा लवकरच दोन सिनेमांच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. ‘ए वतन मेरे वतन’ आणि ‘मर्डर मुबारक’ सिनेमा सारा झळकणार आहे. सध्या सध्या तिच्या दोन सिनेमांमुळे चर्चेत आहे. चाहते देखील साराला नव्या भूमिकेत पाहाण्यासाठी प्रतीक्षेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *