एकत्र निवडणुका लढवण्याच्या तीन पक्ष्यांच्या स्वप्नाला कोल्हापुरातच तडा

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक (election) आघाडी म्हणून लढवण्याचे स्वप्न बांधले जात असताना प्रत्यक्षात शिवसेनेला वगळून भाजपाचाच आघाडीत समावेश झाल्याचे आज स्पष्ट झाले. यामुळे महाविकास आघाडी म्हणून यापुढे एकत्र निवडणुका लढवण्याचे तीन पक्ष्यांच्या स्वप्नाला कोल्हापुरातच तडा गेला आहे.

काल पालकमंत्री सतेज पाटील यांनी दूध संस्था – भैया माने, बँक पतसंस्था – प्रकाश आवाडे, प्रक्रिया – मदन कारंडे, महिला – ऋतिका शाहू काटकर, इतर मागासवर्गीय – विजयसिंह माने, अनुसूचित जाती – आमदार राजू आवळे या उमेदवारांची नावे जाहीर केली होती. पण आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी सत्ताधारी गटाला गटासमोर संमिश्र चित्र होते.

भाजपात आनंद

दरम्यान भारतीय जनता पक्ष व सहयोगी पक्षांना सन्मानजनक ५ जागा दिल्यामुळे भाजप सत्ताधारी आघाडी सोबत राहणार असल्याची माहिती प्रवक्ते धनंजय महाडिक, जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी पत्रकाद्वारे दिली. बँक गट – सहयोगी सदस्य आमदार आवाडे, मागासवर्गीय गट – जनसुराज्यचे विकास माने, प्रक्रिया गट – प्रदीप पाटील यांना उमेदवारी दिली आहे. अमल महाडिक बिनविरोध विजय झाले असून एका स्वीकृत जागेवर संधी दिली जाणार आहे. सत्ताधारी आघाडीच्या सर्व उमेदवारांना निवडून (election) आणण्यासाठी भाजप ताकदीने या आघाडी सोबत राहणार असल्याचे पत्रकात म्हटले आहे.

बडे नेते बिनविरोध

पालकमंत्री सतेज पाटील यांच्यापाठोपाठ बँकेचे अध्यक्ष ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ हे कालपर्यंत बिनविरोध विजयी झाले होते. आज ही संख्या आणखी वाढली. त्यामध्ये करवीर आमदार पी. एन. पाटील (करवीर), आमदार राजेश पाटील (चंदगड), माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या ऐवजी माजी आमदार अमल महाडिक (हातकणंगले) व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील (राधानगरी) हे बिनविरोध विजयी झाले. गडिहग्लज, भुदरगड, पन्हाळा येथे आघाडीला विजय मिळेल, असा विश्वास मुश्रीफ यांनी व्यक्त केला. शिवसेनेने सत्ताधारी आघाडीला प्रतिसाद दिला नाही असा उल्लेख करून मुश्रीफ यांनी महिला – निवेदिता माने, भटक्या जाती – स्मिता युवराज गवळी, प्रक्रिया – प्रदीप पाटील भुयेकर या तीन गटातील उमेदवार जाहीर केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *