राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर व माजी खासदार निवेदिता माने दोघांबाबत मातोश्रीवर तक्रार करणार

(political news) सत्ताधारी आघाडीने शिवसेनेला समाधानकारक जागा वाटप केले नाही,या मुद्दय़ावरून मंगळवारी शिवसेनेने कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत स्वतंत्र आघाडीची घोषणा केली. यामुळे बँकेत सर्वपक्षीय मित्र पक्षांची आघाडी स्थापन करण्याच्या करण्याचे सत्ताधाऱ्यांची अपेक्षा फोल ठरली.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जागावाटपावरून संघर्ष सुरू होता. काल दिवसभरात जागावाटपावरून चर्चेच्या एकामागून एक बैठका होत होत्या. मात्र निर्णय झाला नव्हता. सत्तारूढ गटाने उमेदवार जाहीर करतानाच शिवसेनेने सहकार्य करावे असे आवाहन केले होते. आज पुन्हा बँकेचे अध्यक्ष, ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी शिवसेनेला पुन्हा एकदा आघाडीत येण्याचे आवाहन केले. तथापि शिवसेनेने समाधानकारक जागावाटप केले नसल्याचे कारण देत स्वतंत्र लढण्याची भूमिका जाहीर केली.
संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये राजर्षी शाहू शेतकरी परिवर्तन आघाडी स्थापन केल्याचे घोषित केले. या आघाडीत शिवसेना, शेकाप, आरपीआय या मित्रपक्षांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. या आघाडीचे उमेदवार या प्रमाणे प्रक्रिया गट – संचालक खासदार संजय मंडलिक, संचालक बाबासाहेब पाटील आसुर्लेकर, बँक पतसंस्था – अर्जुन आबिटकर (आमदार प्रकाश आबिटकर यांचे बंधू), महिला – लतिका पांडुरंग पाटील, रेखा सुरेश कुराडे, इतर मागास – रवींद्र बाजीराव मडके, अनुसूचित जाती – उत्तम कांबळे, विमुक्त जाती – विश्वास जाधव. (political news)
मातोश्रीवर तक्रार
दरम्यान, शिवसेनेतून राज्यमंत्री झालेले राजेंद्र पाटील-यड्रावकर व महिला गटाच्या संचालिका माजी खासदार निवेदिता माने यांनी सत्ताधारी गटाबरोबर राहण्याचा निर्णय घेतला आहे. या दोघांबाबत मातोश्रीवर तक्रार करणार असल्याचे शिवसेनेच्या वतीने सांगण्यात आले.