जिल्ह्यातील वकिलांनी आक्रमक पवित्रा घेऊन ‘हा’ लढा आक्रमक करण्याचा घेतला निर्णय
खंडपीठ कृती समितीचे शिष्टमंडळ आज केंद्रीय कायदा मंत्री किरण रिजिजू(kiran rijiju) यांच्या भेटीसाठी दिल्लीला(delhi) रवाना झाले. उद्या (ता. २२) दुपारी चार वाजता त्यांची भेट होणार आहे. कालच माजी राज्यपाल आणि खासदार श्रीनिवास पाटील(mp shriniwas patil) यांनी मंत्री रिजिजू यांची भेट घेऊन खंडपीठ कृती समितीचा लढा आणि सध्या असलेली सर्किट बेंचची गरज याची माहिती दिली आहे. केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम मंत्री नारायण राणे(narayan rane) यांच्या सोबत समितीचे शिष्टमंडळ मंत्र्यांची भेट घेणार आहेत.
उच्च न्यायालयाचे (high court)सर्किट बेंच कोल्हापुरात होण्यासाठी गेली ३४ वर्षे लढा सुरू आहे. त्यानंतर पुन्हा एकदा कोल्हापूरसह सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि सोलापूर जिल्ह्यातील वकिलांनी आक्रमक पवित्रा घेऊन हा लढा आक्रमक करण्याचा निर्णय घेतला आहे. यातील एक भाग म्हणून केंद्रीय कायदा मंत्र्यांची भेट होती. सर्किट बेंचबाबत मंत्री रिजिजू यांना भेटून माहिती देण्याची विनंती कृती समितीने खासदार पाटील यांना केली होती. त्यानुसार काल खासदार पाटील यांनी भेट घेतली.
दरम्यान उद्या, दुपारी चार वाजता मंत्र्यांच्या दालनात बैठक होणार आहे. तीत मुंबई उच्च न्यायालयाचे (high court) सर्किट बेंच कोल्हापुरात होण्यासाठी असलेली सर्व अनुकुलता सांगण्यात येणार आहे. यासाठी केंद्रीय मंत्री राणे यांनी पुढाकार घेतला आहे. रवाना झालेल्या शिष्टमंडळात कृती समितीचे निमंत्रक आणि जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. गिरीश खडके, महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलचे सदस्य ॲड. विवेक घाटगे (कोल्हापूर), वसंतराव भोसले (सातारा) आणि संग्राम देसाई (सिंधुदुर्ग) यांच्यासह माजी अध्यक्ष ॲड. महादेवराव अडगुळे, बार असोसिएशनचे सचिव विजय ताटे-देशमुख आणि ॲड. संतोष शहा यांचा समावेश आहे.
एक पाऊल पुढे
खंडपीठ कृती समितीला उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांनी जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात भेट देण्याबाबत सकारात्मकता दाखविली आहे. याचबरोबर उद्या केंद्रीय कायदे मंत्री यांची भेट होणार आहे. या भेटीने सर्किट बेंच होण्यासाठी एक पाऊल पुढे पडत आहे. यापूर्वीही तत्कालीन मुख्यमंत्री, मुख्य न्यायमूर्ती यांच्या भेटी झाल्या आहेत. मात्र आता थेट केंद्रीय कायदा मंत्र्यांचीही भेट होत आहे.