शिरोळची राजकीय समीकरणे बदलणार

(political news) सत्ताधारी गटाकडून सेवा संस्था गटातून आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांची उमेदवारी जाहीर केली आहे. तर गणपतराव पाटील हेही अपक्ष रिंगणात असले तरी सर्वपक्षीयांच्या ताकदीमुळे गणपतराव पाटील विरुद्ध मंत्री यड्रावकर यांच्यात थेट लढत होणार आहे. जिल्ह्यात ही अत्यंत लढत तुल्यबळ होणार असल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. या निवडणुकीचे पडसादही आता आगामी नगरपालिका, जि.प. व अन्य स्थानिक निवडणुकीवर उमटणार आहेत. त्यामुळे केडीसीसीमुळे शिरोळची राजकीय रणनीती बदलणार आहे.

गणपतराव पाटील यांनी माघारीस नकार दिल्याने जिल्हा नेतृत्वासमोर मोठा पेच
जिल्हा बँकेसाठी गेल्या आठ दिवसांपासून बिनविरोधसाठी हालचाली सुरू होत्या. अखेर यावर जिल्हा नेतृत्वाने एकाची बिनविरोध व एकाची स्वीकृत संचालक घेऊ, असा पर्याय दोघांसमोर ठेवला होता. त्यानंतरही आरोग्य राज्यमंत्री यड्रावकर यांनी मी निवडणूक लढविणारच आहे, अशी भूमिका जिल्हा नेतृत्वाकडे मांडली होती. त्यानंतर गणपतराव पाटील यांना स्वीकृत संचालक केले जाईल, अशीही भूमिका नेत्यांनी मांडली होती. मात्र, गणपतराव पाटील यांनी माघारीस नकार दिल्याने जिल्हा नेतृत्वासमोर मोठा पेच निर्माण झाला होता. (political news)

वेगवान घडामोडीनंतर सत्तारूढ गटाने यड्रावकर यांची उमेदवारी घोषित केली. तर गणपतराव पाटील यांनीही अपक्ष निवडणुकीला सामोरे जात असल्याचे सांगितले. दुसरीकडे पालकमंत्री सतेज पाटील यांनी गणपतराव पाटील यांना स्वीकृत करून स्वाभिमानीच्या संदीप कारंडे यांना एक जागा देऊ, असे शेट्टी यांना सांगितले होते. मात्र, गणपतराव पाटील यांनी अपक्ष लढतीची भूमिका घेतल्याने पुन्हा एकदा शिरोळमध्ये यड्रावकर विरुद्ध गणपतराव पाटील असा निवडणुकीचा आखाडा रंगणार आहे. एकंदरीतच ना. यड्रावकर यांच्या विरोधात सर्व पक्ष एकत्रित येऊन गणपतराव पाटील यांना पुढे केले असले, तरी हा संघर्ष सर्वच निवडणुकीत आता टोकाचा संघर्ष दिसून येणार आहे.

शिरोळ तालुक्यात पात्र संस्था 556 आहेत. यात कृषी पतसेवा संस्था गटात 149, पाणी पुरवठा व इतर संस्था 256 असून यातून यातील 149 ठरावधारक संस्थागटासाठी मतदान करणार आहेत. दोन्हीं उमेदवारांकडून आपल्या बाजूने निर्णायक मतदान असल्याचे ठामपणे सांगितले जात आहेत. मात्र, उमेदवारांकडून सांगितले जात असणारा मतदारांचा आकडा हा एकूण मतसंख्येपेक्षा भिन्न आहे. यात लढत चुरशीची असल्याने साम, दाम, दंड, भेद, नीती दोन्हीकडूनही अवलंबली जात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *