कोल्हापूर जिल्हा कोरोना अपडेट

जिल्ह्यातील कोरोना संसर्ग (corona cases) दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या 24 तासांत 224 नव्या कोरोनाबाधितांची भर पडली असून, कोयना कॉलनी, गांधीनगर येथील 88 वर्षीय वृद्धाचा कोरोनाने मृत्यू झाला. मंगळवारी दिवसभरात 28 जणांनी कोरोनावर मात केली. बाधितांमध्ये कोल्हापूर शहरातील 140 जणांचा समावेश आहे.

सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 1 हजार 118 झाली असली, तरी फक्‍त 137 जणांवर रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. चंदगड, गगनबावडा, राधानगरी तालुक्यांत एकही बाधित रुग्ण आढळलेला नाही.

कोल्हापूर शहराबरोबरच इचलकरंजी येथेही कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. मंगळवारी येथे 15 बाधित सापडले असून, आजरा 3, भुदरगड, शाहूवाडी तालुक्यांत प्रत्येकी 1, गडहिंग्लज 11, हातकणंगले 18, कागल 2, करवीर 14, पन्हाळा, शिरोळ तालुक्यांत प्रत्येकी 5 रुग्ण सापडले. तसेच बाधितांमध्ये रत्नागिरी, उस्मानाबाद, पुणेसह कर्नाटक येथील प्रत्येकी 1, अहमदनगर 2, सांगलीतील 3 जणांचा बाधितांमध्ये समावेश आहे.

शासकीय प्रयोगशाळेत 1 हजार 236 नमुने तपासले. यामध्ये 56 जणांना कोरोना संसर्ग (corona cases) झाल्याचे निष्पन्‍न झाले. खासगी प्रयोगशाळेत 556 नमुने तपासले. यात 168 जणांचे अहवाल बाधित प्राप्‍त झाले. यामध्ये 7 जणांचे नमुने फेरतपासणीचे होते. दिवसभरात शासकीयसह खासगी 266 जणांची कोरोनाची प्राथमिक तपासणी झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *