कोल्हापुरात पोलिसांच्या सतर्कतेमुळे टळला मोठा अनर्थ

पोलीस (police) कधीही वेळेवर येत नाहीत, गुन्हा घडल्यानंतर ते येतात अशीच समजूत आपली आहे. पण या मानसिकतेला छेद देणारी घटना कोल्हापुरात घडली आहे. अनर्थ घडण्याआधी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्याने मायलेकीचे प्राण (Police saved mother and daughter’s life) वाचले आहे. संबंधित मायलेकी आत्महत्या (mother and daughter went to commits suicide) करण्यासाठी कोल्हापुरातील (Kolhapur) रंकाळा (Rankala) परिसरात आल्या होत्या. आत्महत्या करण्याच्या उद्देशानं त्या संबंधित परिसरात घुटमळत होत्या, याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत, दोघी मायलेकींना ताब्यात घेतलं. पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील महिला 45 वर्षांची आहे, तर मुलगी 18 वर्षांची आहे. दोघी मायलेकी पन्हाळा (panhala) तालुक्यातील पश्चिमेकडील एका गावातील रहिवासी आहेत. संबंधित महिलेच्या घरात कौटुंबीक वाद (Family dispute) झाला होता. मुलाचं शिक्षण झालं नाही, त्यामुळे त्याचीही मानसिक स्थिती चांगली नसते. त्यामुळे वारंवार होणाऱ्या घरगुती वादाला कंटाळून या मायलेकी आत्महत्या करण्याच्या उद्देशानं रंकाळा परिसरात आल्या होत्या.

शुक्रवारी दुपारी त्या आत्महत्या करण्यासाठी रंकाळा परिसरात घुटमळत होत्या. दरम्यान परिसरात अज्ञात व्यक्तीला संशय आल्यानं त्यांनी घटनेची माहिती जुना राजवाडा पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच जुना राजवाडा पोलिसांनी तातडीनं महिला पोलिसांना घटनास्थळी पाठवून आत्महत्येच्या प्रयत्नात असणाऱ्या मायलेकींना ताब्यात घेतलं. संभाव्य धोका लक्षात घेऊन पोलिसांनी पीडित मायलेकींना पोलीस ठाण्यात आणलं. याठिकाणी पोलिसांनी त्यांची विचारपूस केली असता, रात्री उशिरापर्यंत त्या माहिती देण्यास तयार नव्हत्या.

यानंतर, महिला पोलिसांनी (police) दोघींना विश्वासात घेऊन आपुलकीने विचारपूस केली असता, पती त्रास देत असल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी पीडित महिलेच्या पतीला पोलीस ठाण्यात बोलावून घेतलं. त्यानंतर, तीन ते चार तास सर्वांची समजूत पोलिसांनी घातली. तसेच काही दिवस नातेवाईकांकडे जाऊन राहा किंवा काही दिवस सुधारगृहात राहा, असं पोलिसांनी पीडित मायलेकींना सांगितलं. मानसिक स्थिती पूर्वपदावर आल्यानंतर पुन्हा घरी जाता येईल, याबाबतही पोलिसांनी समजूत घातली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *