शिवाजी विद्यापीठाच्या प्रवेश परीक्षा ‘या’ तारखेपासून

शिवाजी विद्यापीठाकडून पदवी, पदव्युत्तर व दूरशिक्षण विभागाच्या विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेशाची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया राबविण्यात येत आहे. 25 मे पासून प्रवेश परीक्षांना (exam) सुरुवात होणार आहे.

वेळापत्रक जाहीर; 10 मे अर्जाची शेवटची मुदत

यूजीसी व एआयसीटीईच्या नियमावलीनुसार विद्यापीठातील अधिविभाग व संलग्‍नित महाविद्यालयांमधील विविध अभ्यासक्रमांच्या 2022-23 च्या प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. नियोजित वेळापत्रकानुसार 25 ते 29 मेदरम्यान प्रवेश परीक्षा (exam) घेण्यात येणार आहे. यात एम.एस्सी., एम.ए., एम.टेक., एमबीए, एमएसडब्ल्यू, बीएस्सी आदी विविध अभ्यासक्रमांचा समावेश आहे. परीक्षेसाठी संलग्‍नित महाविद्यालयांत केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. 10 मेपर्यंत प्रवेश अर्ज प्रक्रियेची शेवटची मुदत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *