मंत्र्यांच्या पीएवर गोळीबार झाल्याने एकच खळबळ उडाली

(crime news) राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख (Minister Shankarrao Gadakh) यांचे स्वीय सहाय्यक राहुल राजळे (Rahul Rajale) यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. मंत्र्यांच्या पीएवर गोळीबार झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. शुक्रवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील घोडेगाव (Ghodegaon Ahmednagar) जवळ ही घटना घडली आहे.

या हल्ल्यात राजळे यांना गोळी लागली आहे. त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अहमदनगरच्या मॅक्सकेअर रूग्णालयात राहुल राजळे यांच्यावर उपचार सुरू आहेत.

राजकीय वैमनस्यातून हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. पाच जणांच्या टोळक्याने हल्ला केल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. हल्लेखोरांचा पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे. मंत्र्याच्या पिएवर गोळीबार झाल्याने खळबळ उडाली आहे. (crime news)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *