मुलीच्या आईचा लग्नाला विरोध; घडलं हादरवणारं कांड
(crime news) काही दिवसांपूर्वी पुण्यात लग्न करण्यास नकार दिल्याने तरुणाने आपलीच मैत्रीण दर्शना पवार हिची हत्या केली होती. दर्शना नुकतीच एमपीएससी परीक्षेत राज्यात चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली होती. यानंतर पुण्यातच एकतर्फी प्रेमातून एका तरुणीवर कोयत्याने हल्ला झाला होता. सुदैवाने ती यातून बचावली. या घटना ताज्या असतानाच नांदेडमधून एक संतापजनक गोष्ट समोर आली आहे. लग्नाला प्रेयसीच्या आईने नकार दिल्याने युवकाने तरुणीला विष पाजून तिचा खून केला. या कृत्यानंतर विष पिऊन स्वतःला देखील संपवण्याचा प्रयत्न केला. नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील भोपाळवाडी येथे ही घटना घडली. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
काय आहे प्रकरण?
भोपाळवाडी गावातील 23 वर्षीय तरुणी सुप्रिया जाधव हिचे याच गावातील रोहिदास जाधव या 25 वर्षीय तरुणासोबत प्रेम संबध होते. एका रात्री दोघांना मुलीच्या आईने एकत्र पाहिले. नंतर मुलाने लग्नाची मागणी घातली. पण मुलीच्या आईने नकार दिला. दरम्यान याच रागातून रोहिदास जाधव याने स्प्राईट या सॉफ्ट ड्रिंकमधून मुलीला विष पाजले. नंतर स्वतः त्याने विष घेतले. यात मुलीचा मृत्यू झाला तर युवकावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी उस्माननगर पोलिसांनी युवकाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे. (crime news)