रवींद्रनाथ टागोरांच्या भूमिकेतील जबरदस्त लूक आला समोर
(entertenment news) बॉलिवूडमध्ये लवकरच रवींद्रनाथ टागोर यांच्या आयुष्यावर चित्रपट येणार आहे. त्यातील अभिनेत्याचा लूक आता समोर आला आहे. बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर यांनी आपल्या कारकिर्दीत एकापेक्षा जास्त हिट चित्रपट दिले आहेत. या अभिनेत्याने आतापर्यंत 500 हून अधिक चित्रपट केले आहेत.
नुकतेच अनुपम खेर यांनी त्यांच्या नवीन चित्रपटाची अधिकृत घोषणा केली आहे. या चित्रपटात अभिनेता एका नव्या व्यक्तिरेखेत दिसणार आहे. अनुपम खेर लवकरच गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटातील त्याचा एक लूकही समोर आला आहे. या भूमिकेत अनुपम खेर हुबेहूब रवींद्रनाथ टागोर यांच्यासारखेच दिसत असून फोटो पाहून त्यांना ओळखणेही कठीण आहे.
अभिनेत्याचा हा लूक पाहून आता चित्रपट पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक झाले आहेत. या चित्रपटाची घोषणा करत अभिनेत्याने लिहिले, ‘हे माझे भाग्य आहे की मला पडद्यावर गुरुदेवांना मूर्त रूप देण्याचा बहुमान मिळाला! लवकरच तुमच्यासोबत या चित्रपटाचे अधिक माहिती शेअर करू!’ (entertenment news)
अनुपम खेर यांना सोशल मीडियावर चाहते या नव्या चित्रपटासाठी शुभेच्छा देत आहेत. अनुपम खेर सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. अभिनेते अनेकदा त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनाशी संबंधित अपडेट्स चाहत्यांसह शेअर करताना दिसतात.