रामायण मधून आलियाचा पत्ता कट? सीतेच्या भूमिकेसाठी ‘या’ अभिनेत्रीचं नाव चर्चेत
(entertenment news) आदिपुरुष या चित्रपटानंतर आता नितेश तिवारी यांच्या ‘रामायण’चित्रपटाची चर्चा आहे. चित्रपट निर्माते नितेश तिवारी यांचा ‘रामायण’ हा चित्रपट जाहीर झाल्यापासून चर्चेत आहे. वृत्तानुसार, या चित्रपटात रणबीर कपूर रामच्या भूमिकेत दिसणार आहे. दुसरीकडे, आलिया भट्ट या चित्रपटात सीतेच्या भूमिकेत दिसणार असल्याचीही माहिती समोर आली होती.
मात्र आता या चित्रपटाविषयी मोठी अपडेट समोर आली आहे. सीतेच्या भूमिकेसाठी आलिया ऐवजी एका दाक्षिणात्य अभिनेत्रीच्या नावाची चर्चा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, निर्मात्यांनी रणबीरसोबत साऊथची सुपरस्टार साई पल्लवीला कास्ट करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यामुळे आता नवीन अपडेटनुसार या चित्रपटात रणबीर श्रीराम आणि साई पल्लवी सीतेची भूमिका साकारणार आहे. मात्र याविषयी निर्मात्यांकडून अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. (entertenment news)