कोल्हापूरकरांमध्ये दहशत; नागरिक भीतीच्या सावटाखाली
कोल्हापुरातून एक विचित्र घटना समोर आली आहे. शहरातील गांधीनगरमध्ये एका गाढवानं (donkey) धुमाकूळ घातला आहे. या गाढवानं आतापर्यंत तीन जणांना धडक दिली आहे. त्यातील एक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. रस्त्यानं जात असलेल्या व्यक्तींना हे गाढव मागून अचानक येऊन धडक देते. या गाढवामुळे नागरिकांमध्ये दहशत पसरली असून, या गाढवाचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात येत आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, गांधीनगरमध्ये या गाढवामुळे नागरिक भीतीच्या सावटाखाली आहेत. या गाढवानं आतापर्यंत तीन जणांना धडक दिली आहे. त्यातील एक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. रस्त्याने जात असलेल्या व्यक्तीला अचानकपणे या गाढवाने मागून धडक दिल्याचं व्हिडीओमध्ये पहायला मिळत आहे.
गाढवानं (donkey) धडक दिल्यानंतर हा व्यक्ती खाली पडला. त्यानंतर गाढवानं या व्यक्तीच्या पायाचा चावा घ्यायला सुरुवात केली. बराच वेळ त्या व्यक्तीच्या जवळ गाढव थांबून होते. इतर नागरिकांनी त्याला हुसकवण्याचा प्रयत्न केला तरीही गाढव या वक्तिच्या पायाचा चावा घेण्याचा प्रयत्न करतच होते. शेवटी एकाने काठीने मारहाण केल्यानंतर गाढव पळून गेले. या गाढवाने आतापर्यंत तिघांना धडक दिली असून ,नागरिकांनी त्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.