कोल्हापूर : कोयना एक्स्प्रेस, 4 पॅसेंजर आज रद्द

कोल्हापुरातून सुटणारी कोल्हापूर-मुंबई आणि मुंबईत सुटणारी मुंबई-कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस (Express) सोमवारी रद्द करण्यात आली आहे. कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस पुण्यातून सुटणार आहे, तर गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस पुण्यापर्यंत येणार आहे. कोल्हापूर-मुंबई महालक्ष्मी एक्स्प्रेस रात्री 11 वाजता सुटणार आहे.

सांगली-नांद्रे मार्गावर सोमवारी (दि.10) दुहेरीकरणासाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे कोल्हापूर-सातारा-पुणे मार्गावरील रेल्वे विस्कळीत होणार आहे. पुणे-कोल्हापूर व कोल्हापूर-पुणे एक्स्प्रेस, कोल्हापूर-सातारा, सातारा-कोल्हापूर पॅसेंजर रद्द करण्यात आली आहे. सायंकाळी सुटणारी कोल्हापूर-सांगली पॅसेंजर मिरजपर्यंतच धावणार आहे.

सोमवारी कोल्हापुरात पोहोचणारी गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस (Express) पुण्यापर्यंतच धावणार आहे. तर कोल्हापुरातून सुटणारी महाराष्ट्र एक्स्प्रेस पुण्यातून रात्री 10 वाजून 25 मिनिटांनी सुटणार आहे. कोल्हापूर-मुंबई महालक्ष्मी एक्स्प्रेस रात्री 8 वाजून 50 मिनिटांऐवजी रात्री 11 वाजता सुटणार आहे.

सातारा-कोल्हापूर आणि कोल्हापूर-सातारा पॅसेंजर सोमवारी धावणार नाही. यामुळे नोकरदार, विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होणार आहे. अहमदाबाद-कोल्हापूर एक्स्प्रेस पुणे-मिरज या मार्गाऐवजी पुणे-दौंड-कुर्डुवाडी-मिरजमार्गे कोल्हापूर अशी येणार आहे. यामुळे ही गाडी नियमित वेळेपेक्षा उशिराने पोहोचण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *