दीपिका पदुकोणला एका कंपनीमुळे मोठा आर्थिक फटका

(entertenment news) अभिनय क्षेत्रात यशस्वी करिअर करत असतानाच दीपिका पदुकोणने इतर क्षेत्रातही व्यवसायासाठी मोठी गुंतवणूक केली आहे. गेल्या काही वर्षांत दीपिकाने विविध क्षेत्रातील स्टार्ट-अप कंपनीत चांगली गुंतवणूक केली. 2014 मध्ये तिने केए एंटरप्रायझेस ही कंपनी स्थापित केली आणि या कंपनीच्या माध्यमातून तिने विविध स्टार्ट-अप्समध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली होती. एपिगामिया, फर्लेंको, ब्लू स्मार्ट, बेलाट्रिक्स, ॲटमबर्ग टेक्नॉलॉजिस, फ्रंट रो, मोकोबारा, सुपरटेल्स आणि नुआ यांसारख्या कंपनींमध्ये तिने तगडी गुंतवणूक करून ठेवली आहे. मात्र यापैकी एका स्टार्ट कंपनीमुळे तिला सध्या मोठा आर्थिक फटका बसला आहे. कारण फ्रंट रो ही स्टार्ट अप कंपनी बंद पडली आहे.

फ्रंट रो या कंपनीत दीपिकासोबतच प्रसिद्ध रॅपर रफ्तारनेही गुंतवणूक केली होती. आता या शैक्षणिक व्यासपीठातील 75 टक्के कर्मचाऱ्यांनी नोकरी सोडल्यानंतर कामकाज बंद केलं आहे. सोमवारी बीक्यू प्राइमला दिलेल्या निवेदनात कंपनीचे सह-संस्थापक इशान प्रीत सिंग यांनी याबद्दलची माहिती दिली. ’30 जून रोजी या स्टार्टअपने अधिकृतपणे संपूर्ण कामकाज बंद केलं आहे’, असं ते म्हणाले.

दीपिका पदुकोण आणि Raftaar सारख्या ख्यातनाम व्यक्तींचा पाठिंबा असलेल्या FrontRow या शैक्षणिक व्यासपीठाने 75% कर्मचारी सोडल्यानंतर व्यवसायाचे कामकाज बंद केले आहे. सोमवारी बीक्यू प्राइमला दिलेल्या निवेदनात, सह-संस्थापक इशान प्रीत सिंग यांनी ही बातमी उघड केली आणि सांगितले की स्टार्टअपने 30 जून रोजी अधिकृतपणे नियमित कामकाज बंद केले. या कंपनीचं भांडवल परत करण्याबाबत आणि संभाव्य खरेदी कराराचा शोध घेण्याचा प्रयत्न करत असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. पुढील काही महिन्यात कंपनी बोर्ड आणि ते यावर मिळून निर्णय घेणार आहेत. (entertenment news)

“आम्ही नॉन-अकॅडेमिक क्षेत्रात बाजारपेठेतील योग्यता ओळखण्यासाठी अनेक प्रयोग केले. आम्ही मुलांसाठी ऑफलाइन सर्वांगीण विकास आणि प्रौढांसाठी करिअर केंद्रीत शिक्षणासह तीन ते चार चाचण्या घेतल्या. एलिव्हेशन कॅपिटलसारख्या गुंतवणूकरदारांसह लाइटस्पीड व्हेंचर पार्टनर्स, क्रेडचे कुणाल शाह, अनॅकॅडमीचे गौरव मुंजाळ आणि शेअर चॅटचे फरीद अहसान यांच्या मदतीने या स्टार्टअपने जवळपास 17.2 दशलक्ष डॉलर म्हणजेच सुमारे 130 कोटी रुपये उभारले होते”, असा दावा इशान यांनी यावेळी केला.

या कंपनीतील गुंतवणुकीशिवाय दीपिकाने काही महिन्यांपूर्वीच तिचा स्किनकेअर ब्रँडसुद्धा लाँच केला आहे. या ब्रँडचा चाहतावर्गसुद्धा निर्माण झाला आहे. अभिनय क्षेत्रात काम करतानाच इतर व्यवसायातही ती स्वत:ची वेगळी छाप सोडण्याचा प्रयत्न करतेय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *