मौनी रॉयचा विमानतळाच्या दारातच गोंधळ; ‘या’ कारणामुळे विमानतळावर नो एन्ट्री
(entertenment news) बॉलिवूड अभिनेत्री या बऱ्याचवेळा त्यांच्या एअरपोर्ट लूकमुळे चर्चेत असतात. कधी त्यांचा एअरपोर्टवरील लूक पाहून नेटकरी त्यांची स्तुती करतात तर कधी त्यांना ट्रोल करतात. दरम्यान, आता एका अभिनेत्रीसोबत एअरपोर्टवर असे काही झाले की तिला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. ती अभिनेत्री म्हणजे मौनी रॉय. मौनी रॉय ही एअरपोर्टवर तर पोहोचली पण ती तिचा पासपोर्ट मात्र, घरीच विसरली. त्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
मौनी रॉयचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीनं शेअर केला आहे. या व्हिडीओत मौनी ही एअरपोर्टवर असल्याचे दिसते. याच दरम्यान, एअरपोर्टवर आत जाण्याआधी तिथे असलेल्या सुरक्षा रक्षकाने तिच्याकडे तिचा पासपोर्ट चेक करण्यासाठी मागितला. तिने लगेचच बॅगेत तिचा पार्सपोर्ट शोधायला सुरुवात केली, पण तिला पासपोर्ट सापलडला नाही. मौनी तिच्या बॅगमध्ये काही तरी शोधत आहे हे तिथे उपस्थित असलेल्या लोकांना कळले. खरंतर एअरपोर्टवर गेल्यावर मौनीच्या लक्षात आलं की ती पासपोर्ट घरीच विसरली आहे. काय झालं? तू आत जात का नाही आहे? पापाराझींनी विचारलेल्या या प्रश्नावर उत्तर देत मौनी म्हणाली की मी माझा पासपोर्ट घरीच विसरले. मौनी पासपोर्ट घरी विसरल्यानं तिला एअरपोर्टवर घेण्यात आलं नाही.
मौनीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर कमेंट करत एक नेटकरी म्हणाला की ‘शिवण्या तू कोण आहेस हे सगळ्यांना दाखवून दे… नागिन आहेस तू.’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘पासपोर्ट होता कपडे नाही.’ तिसरा नेटकरी म्हणाला ‘काय करणार… पासपोर्ट विसरली मेकअप विसरली नाहीस.’ आणखी एक नेटकरी म्हणाला, ‘पापाराझींना फोन करण्याच्या चक्करमध्ये पासपोर्ट विसरली.’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘हे असं होतं जेव्हा तुम्ही प्रत्येक कामासाठी माणसं ठेवली असतात. सर्वसामान्य लोकांसाठी पासपोर्ट महत्त्वाचा असतो ते स्वत: जवर सगळ्यात आधी तेच ठेवतात.’ तिसरा नेटकरी म्हणाला, ‘ती नागिन आहे तिला कसला त्रास.’ (entertenment news)
दरम्यान, मौनीच्या कामाविषयी बोलायचं झालं तर सध्या ती ‘द वर्जिन ट्री’ या चित्रपटासाठी चर्चेत आहे. या चित्रपटात तिच्यासोबत संजय दत्त आणि पलक तिवारी दिसणार आहेत. मौनी रॉय ही लोकप्रिय अभिनेत्री असून तिचे फक्त भारतात नाही तर परदेशातही लाखो चाहते आहेत.