कोल्हापूर जिल्ह्यात चिंता वाढली!

जिल्ह्यात दिवसभर (Rain In Kolhapur) ऊन-पावसाचा खेळ सुरु असून उष्माही प्रचंड वाढला आहे. पावसाने ओढ दिल्याने राधानगरी धरणातून (Radhanagari Dam) सुरु असलेल्या ७०० क्युसेक पाण्याचा विसर्ग पूर्णत: बंद केला आहे. त्यामुळे, पंचगंगेसह इतर नद्यांच्या पाणी पातळी झपाट्याने घट होत आहे.

कसबा बावडा येथील राजाराम बंधारा येथे पंचगंगा नदीची पाणी पातळी १४ फुटांपर्यंत खाली गेली आहे. तर, जिल्ह्यातील एकही बंधारा सध्या पाण्याखाली नाही. गावागावांत होणाऱ्या पावसाळी जत्रांमध्ये ग्रामदैवताकडे जोरदार पावसाची मागणी आणि नवस केले जात आहेत.

जिल्ह्यात पावसाने दिलेल्या ओढीमुळे धरणातील पाणीसाठा गतीने होत नाही. राधानगरीसह वारणा, दुधगंगा धरणातील पाणीसाठा वाढलेला नाही. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. गेल्यावर्षी आजच्या दिवशी राधानगरी धरणात ४.५० टीएमसी पाणीसाठा होता.

काळम्मावाडी धरणात १२ टीएसमी व वारणा धरणात १८ पाणीसाठा होता. आज मात्र तिपटीने कमी पाणीसाठा कमी आहे. उद्यापासून सोमवारपर्यंत चांगला पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे जोरदार पावसाची अजूनही प्रतीक्षा असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे.

जिल्ह्यातील धरणांमधील आजचा पाणीसाठा

धरण एकूण क्षमता आजचा पाणीसाठा (टीएमसीमध्ये)

राधानगरी ८.३६ ३.४९ (Radhanagari Dam)

तुळशी ३.४७ ०.९६

वारणा ३४.३९ १४.१७

दूधगंगा २५.३९ ४.२०

कासारी २.७७ ०.९९

कडवी २.५१ १.०३

कुंभी २.७१ १.३१

पाटगाव ३.७१ १.३९

चिकोत्रा १.५२ ०.४५

चित्री १.८८ ०.४३

जंगमहट्टी १.२२ ०.३५

घटप्रभा १.५६ १.५०

जांबरे ०.८१ ०.५०

आंबेओहोळ १.२४ ०.४०

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *