शरद पवारांबाबत आंतरराष्ट्रीय ब्राह्मण परिषदेनं घेतला मोठा निर्णय

ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ब्राह्मण समाजाला (Brahmin Community) मदत केली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय ब्राह्मण परिषदेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते या राष्ट्रवादीच्या पाठीशी खंबीरपणे राहणार आहेत, असं स्पष्ट मत मकरंद कुलकर्णी आणि ॲड. विजय जमदग्नी यांनी व्यक्त केलं.

याबाबतचे पत्र त्यांना पाठविले असल्याचेही परिषदेचे कार्यकारिणी प्रमुख मकरंद कुलकर्णी आणि अध्यक्ष ॲड. विजय जमदग्नी यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले. जो राजकीय पक्ष आमच्या समाजाचे काम करेल त्याच्या पाठीशी राहण्याचे धोरण स्वीकारले आणि कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने आम्हाला मदत केली. त्यामुळे नैतिकदृष्ट्या परिषदेने या ‘राष्ट्रवादी’च्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतला आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये जो पक्ष आमच्या समाजाचे काम करील. त्याच्याबरोबर असणार आहे. त्यामुळे एखाद्या पक्षाने समाजाला हक्काचा मतदार म्हणून त्या पक्षाने गृहीत धरू नये.

महाविकास आघाडीने ब्राह्मण समाजाची (Brahmin Community) अमृत संस्था स्थापन केली. त्यासाठी ५० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. मात्र, शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून या संस्थेचे काम ‘जैसे-थे’ स्थितीत आहे, असे कुलकर्णी यांनी सांगितले. प्रदीप अष्टेकर, स्वानंद गोसावी, अजित देशपांडे, केदार कानिटकर, कमलाकर देशपांडे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *