देशभरातील 270 खासदारांत मंडलिकांनी पटकावला ‘हा’ क्रमांक; NCP चा ‘हा’ बडा नेता कितव्या क्रमांकावर?

लोकसभेत (Loksabha) पहिल्यांदाच आलेल्या देशभरातील २७० खासदारांत कोल्हापूरचे खासदार प्रा. संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांनी पाचवा क्रमांक पटकावला आहे.

लोकसभेत मांडलेले प्रश्‍न, चर्चेतील सहभाग, अन्य मुद्यांवर चर्चा या निकषावर हा क्रमांक ठरवण्यात येतो. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) खासदार डॉ. अमोल कोल्हे तिसरे ठरले आहेत.

सतराव्या लोकसभेत (Loksabha) एकूण खासदारांपैकी २७० खासदार हे पहिल्यांदाच निवडून आले आहेत. देशपातळीवरील एका संस्थेने अशा खासदारांच्या चार वर्षांतील कामगिरीचा आढावा घेऊन त्याचा निकाल नुकताच जाहीर केला.

त्यात पहिल्या दहा खासदारांना मिळालेले गुण व त्यांचा क्रमांक जाहीर केला. काँग्रेसचे कुलदीपराज शर्मा पहिले, भाजपचे सुकांता मुजुमदार दुसरे, डॉ. कोल्हे तिसरे, तर प्रा. मंडलिक पाचव्या क्रमांकावर आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *