कोल्हापूर : पॉलिशच्या बहाण्याने दीड तोळे सोने लंपास

(crime news) सोने पॉलिश करण्याच्या बहाण्याने सोने केमिकलमध्ये विरघळून ६४ हजारांचे सोने लंपास करण्याची घटना चांदे (ता.राधानगरी) येथे घडली. याबाबत वंदना दिनकर भिसे (वय ३८) यांनी अज्ञातांविरुध्द राधानगरी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे. या घटनेमुळे महिलांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, चांदे येथे २५ ते ३० वयोगटातील हिंदीमध्ये व मराठीत अडखळत बोलणारा तरुण सोने पॉलिश करण्यासाठी आला होता. येथील वंदना दिनकर भिसे यांनी आपल्या साडेतीन तोळ्याच्या पाटल्या पॉलिशसाठी त्याच्याकडे दिल्या. त्या भामट्याने पाटल्या केमिकलमध्ये घातल्या, त्यानंतर पॉलिश केल्या असे सांगत भिसे यांच्याकडे देऊन निघून गेला.

दिलेल्या पाटल्याच्या वजनाबाबत वंदना यांना शंका आली. त्यांनी पाटल्याचे वजन केले असता यामधील दीड तोळे सोने वितळवून घेतल्याचे समोर आले. त्यानंतर याबाबत संगिता यांनी अज्ञात व्यक्तिच्या विरोधात राधानगरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद केला आहे. अधिक तपास पो.नि. ईश्वर ओमासे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना.रानगे या करत आहेत. (crime news)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *