सुनील शेट्टीकडून लेकीला प्रेमळ संसारिक सल्ला; मात्र जावयाला दिली WARNING
(entertenment news) अभिनेता सुनील शेट्टी (Suniel Shetty) हा त्याच्या अभिनयाबरोबरच खासगी आयुष्यामुळेही चर्चेत असतो. सुनील शेट्टी हा त्यांच्या कामाबरोबर कौटुंबिक आयुष्याचा बॅलेन्स अगदी योग्य पद्धतीने साधतो. आपल्या कुटुंबाला पुरेसा वेळ देण्याचा सुनील शेट्टीचा प्रयत्न असतो. सुनील शेट्टी आणि माना शेट्टी यांचं लग्न 32 वर्षांपूर्वी म्हणजेच 1991 साली झाली. काही महिन्यांपूर्वीच सुनील शेट्टी आणि माना यांचं सासू-सासरे म्हणून प्रमोशन झालं. या दोघांची मुलगी अथियाने (Athiya Shetty) क्रिकेटपटू के. एल. राहुलबरोबर (KL Rahul) लग्नबंधनात अडकली. लग्नानंतर अनेक महिन्यांनी आता सुनील शेट्टीने अथिया आणि जावई राहुलला लग्नासंदर्भात एक सल्ला दिला आहे. मुलगी अथियाला सल्ला देताना त्यांनी जावयाला थेट इशाराच दिला आहे.
लेकीला सल्ला
61 वर्षीय सुनील शेट्टीने लग्नानंतर आपलं नातं दिर्घकाळ टीकवण्यासाठी आपल्या अनुभवाचे बोल मुलगी अथियाला सांगितलं आहे. बॉलिवूडमध्ये ‘अण्णा’ म्हणजेच मोठा भाऊ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या सुनील शेट्टीने ‘मिड डे’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये आपल्या वैवाहिक आयुष्यातील अनुभव सांगितले. आयुष्यात चढ आणि उतार येतच असतात. मात्र यामुळे नातं कमकुवत न होता अधिक घट्ट झालं पाहिजे, असं सुनील शेट्टीने म्हटलं आहे. सुनील शेट्टीने आपल्या मुलीला सल्ला देताना, “कोणत्याही नात्यामध्ये विश्वास हा सर्वात महत्त्वाची गोष्ट असते. के. एल. राहुल एक खेळाडू असल्याने त्याला दौऱ्यांनिमित्त अनेकदा बाहेर जावं लागतं. त्यामुळेच तो नेहमी अथियाबरोबर फिरायला जाऊ शकत नाही. त्यामुळेच अथियाने त्याच्यावर विश्वास ठेवणं आवश्यक आहे. कारण कलाकारांप्रमाणे खेळाडूंच्या आयुष्यातही अनेक चढ-उतार असतात,” असं म्हटलं आहे. (entertenment news)
के. एल. राहुलला वॉर्निंग
एकीकडे मुलीला सल्ला देताना दुसरीकडे सुनील शेट्टीने जावयाला थेट इशाराच दिला आहे. “एवढं चांगलं व्यक्ती बनू नये की जेव्हा तुमच्याबद्दल आमच्याकडे बोललं जाईल तेव्हा आम्हीच स्वत:ला हीन वाटू लागू. खरेपणा म्हणजे ही व्यक्ती आणि आपल्याकडे काहीच नाही असं दुसऱ्याला वाटेल इतकं चांगलं असू नये मणसाने. के. एल. राहुल अगदी असाच आहे,” असं म्हणत सुनील शेट्टीने म्हटलं आहे. के. एल. राहुलने इतकंही चांगलं वागू नये की आजूबाजूच्यांना स्वत:वरच शंका घ्यावी लागेल, असं सुनील शेट्टीला यामधून सांगायचं होतं. तसेच चांगलं वागणाऱ्यांचा गैरफायदा घेतला जातो असंही सुनील शेट्टीला आपल्या जावयाला इशारा देत सांगायचं होतं. “मी अनेकदा अथियाला सांगतो की तू नशिबवान आहेस,” असंही सुनील शेट्टीने म्हटलं. अथिया आणि के. एल. राहुल 2023 च्या सुरुवातीला लग्नबंधनात अडकले. सुनील शेट्टीच्या खंडाळा येथील फार्म हाऊसवरच या दोघाचं लग्न झालं. मागील बऱ्याच काळापासून हे दोघे एकमेकांना डेट करत होते.