आलिया भट्ट हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल
(entertenment news) अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) सध्या ‘रॉकी और राणी की प्रेम कहाणी’ सिनेमामुळे तुफान चर्चेत आहे. सिनेमात आलिया भट्ट हिच्यासोबत अभिनेता रणवीर सिंग मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सध्या आलिया आणि रणवीर सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. आगामी सिनेमामुळे चर्चेत असणारी आलिया आणखी एका कारणामुळे चर्चेत आली आहे. आलिया हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये आलिया एका फोटोग्राफरची चप्पल उचलताना दिसत आहे. आलियाचा व्हायरल होत असलेला व्हिडीओ पाहून काही चाहते अभिनेत्रीचं कौतुक करत आहेत, तर काहींनी मात्र आलिया ट्रोल केलं आहे.
आलिया भट्ट हिला नुकताच आई सोनी राजदान आणि बहीण शाहीन भट्ट यांच्यासोबत स्पॉट करण्यात आलं. याच दरम्यान आलियाने असं काही केलं ज्यामुळे काही चाहत्यांनी आलियाला डोक्यावर घेतलं आणि तिचं कौतुक केलं. व्हिडीओमध्ये अभिनेत्री फोटोग्राफरला मदत करताना दिसत आहे.
आलिया हिला तिच्या आई आणि बहिणीसोबत पाहताच फोटोग्राफर आलिया हिला कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी जमले. तेव्हा एका फोटोग्राफरच्या पायातून चप्पल निघाली. तेव्हा खुद्द आलियाने चप्पल कोणाची आहे? असं विचारत फोटोग्राफरची चप्पल त्याला नेवून दिली. हे दृष्य सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
आलियाचा स्वभाव पाहून चाहते अभिनेत्रीचं कौतुक करत आहेत. तर काही नेटकऱ्यांनी मात्र अभिनेत्रीला ट्रोल केलं आहे. एक नेटकरी आलियाला ट्रोल करत म्हणाला, ‘एवढं नाटक करु नकोस की ते फेक वाटेल. सामान्य लोकं देखील अशी कोणाची चप्पल उचलत नाहीत.’ अन्य एक नेटकरी म्हणाला, ‘ती आगामी सिनेमाचं प्रमोशन करत आहे.’ आणखी एक नेटकरी म्हणाला, ‘सिनेमा येणार आहे म्हणून, नाही तर तोंड लपवून पळत असते..’
आलिया हिच्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओवर संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळत आहे. आलिया हिच्या व्हिडीओवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. आलिया देखील कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टींची माहिती आलिया सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना देत असते. (entertenment news)
आलिया हिच्या आगामी सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री ‘रॉकी और राणी की प्रेम कहाणी’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमा प्रेमकथेवर आधारलेला आहे.
‘रॉकी और रानी की प्रेम कहाणी’ सिनेमाची कथा एका आलिया – रणवीर यांच्या प्रेमकहाणी भोवती फिरत आहे. सिनेमा २८ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. सिनेमात आलिया, रणवीर यांच्यासोबत जया बच्चन, धर्मेंद्र, शबाना आजमी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.